परभणी : सोनपेठमध्ये आमदारांची गाडी आडवून मराठा आंदोलकाची घोषणाबाजी | पुढारी

परभणी : सोनपेठमध्ये आमदारांची गाडी आडवून मराठा आंदोलकाची घोषणाबाजी

सोनपेठ; पुढारी वृत्तसेवा : मराठा समाजाला आरक्षण द्यावे या मागणीसाठी जिल्हाभरात आंदोलन सुरू आहे. अनेक गावांमध्ये राजकीय पुढार्‍यांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. आज (दि. २६) सोनपेठ येथे पाथरी विधानसभेचे आमदार सुरेश वरपुडकर यांची वाहने सकल मराठा आंदोलकांनी आडवली.

अंतरवाली सराटी येथे सभेसाठी गेलेल्या भगवान मदनराव रोडे (वय ४५ वर्ष) यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान भगवान रोडे यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटूंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गुरुवारी (दि. २६) दुपारी बारा वाजताच्या सुमारास आमदार सुरेश वरपुडकर सोनपेठ येथे आले असता छत्रपती शिवाजी चौक या ठिकाणी त्यांची गाडी आडविण्यात आली. मराठा आरक्षणाचा प्रश्‍न विधानसभेमध्ये मांडावा, मराठा आरक्षणासाठी राजीनाम्याची मागणी करण्यात आली. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. दरम्यान मराठा आरक्षण मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनात राजकीय पुढार्‍यांना गावात प्रवेशबंदी करण्यात आली.

Back to top button