परभणी, पुढारी वृत्तसेवा हिंदू देवीदेवतांवर अभद्र टिपण्णी करणाऱ्या ज्ञानेश्वर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करावा, संत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावर झुंडशाहीचा प्रभाव दाखवून दाबून टाकण्याच प्रयत्न करणाऱ्यांवर अटक करावी, यासह राज्य सरकारने देशी वंशाची गोमाता आता राज्य माता गोमाता घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करण्याच्या ठरावासह ५ महत्त्वपूर्ण ठराव मंगळवारी येथे झालेल्या विभागीय संत संमेलनातून पारीत करण्यात आले.
येथील पाथरी रोडवरील शुभ मंगल कार्यालयात परभणी-हिंगोली जिल्ह्याचे विभागीय संत संमेलन घेण्यात आले. या संमेलनास ३०० संतांची उपस्थिती होती. यावेळी धर्मांतर, मठ मंदिरांवर होत असलेली आक्रमणे, लवजिहाद, हिंदू सुरक्षा संस्कार, जातीय व्यवस्थेपासून ते कुटुंब व्यवस्थेपर्यंतच्या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. व्यासपीठावर वेदातांचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज (वसमत), महंत योगी गोपालनाथ महाराज महंत ज्ञानेश्वर भारती महाराज, तुकाराम महाराज गरूड दैठणकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रास्ताविक विश्व हिंदू परिषदेचे विभागमंत्री प्रा. डॉ. संदीप गोरे यांनी केले. यावेळी संत मंडळींच शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला, वक्फ बोर्ड, निर्मलवारी अभियान, एक गठ्ठा मतदानाचा धडा, विकसीत महाराष्ट्र व नव्या भारताचे नवे फौजदारी कायदे अशा एकूण ५ पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.
हिंदू धर्म आणि संस्कृती या विषयावर शिवाचार्य महाराज यांनी विचार मांडतांना हिंदू संस्कृतीवर अनेक आधार होत आहे. त्याविषयीची जाणीवजागृती ही समाजामध्ये होणे गरजेचे आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. महंत योगी गोपालनाथ महाराज वसई, ज्ञानेश्वर भारती महाराज यांनी देखील मठमंदिरांची होत असलेली विटंबना, हिंदू धर्मातील श्रद्धा केंद्रांचे मजबुतीकरण या अनुषंगाने मंदिरांच्या माध्यमातून हिंदू जनजागरण करणे गरजेचे असल्याचे सांगितले. तुकाराम महाराज दैठणकर यांनी संतांच्या माध्यमातून हिंदू सामाजिक ऐक्य, सामजिक सद्भाव, समरस्ता व सामाजिक सुरक्षा या दृष्टीने मार्गदर्शन केले.
समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत कार्यकारिणी सदस्य नंदू गिरी यांनी केला. सुत्रसंचलन विश्व हिंदू परिषदेचे शिवप्रसाद कोरे यांनी केले, यावेळी राजकुमार भांबरे, संतोष बीडवई संतोष कुटे, ज्ञानोवा महाराज शिवणीकर, महंत पद्मनाभ स्वामी यांनी पाच ठराव मांडले. डॉ. महेश देशमुख यांनी आभार मानले, संमेलनासाठी सहसमन्वयक राजन मानकेश्वर, मनोज धर्माधिकारी, गणेश काळे, प्रकाश शहाणे, द्रोपदी गायकवाड आदीसह मातृशक्ती व दुर्गावाहिनीच्या कार्यकत्यांनी पुढाकार घेतला.
• हिंदू देवतांवरील अभद्र टिप्पणी करणा-यांवर गुन्हा दाखल करावा.
शरद पवार व शाहू महाराज यांनी हिंदू समाजाची माफी मागावी.
संत रामगिरी महाराज यांच्या वक्तव्यावरून झुंडशाही दाखविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी.
• संभाजीनगर नावावरून छत्रपती संभाजीनगरात सुरू असलेल्या कारवायांना प्रतिबंध करावा, माजी खा. इम्तियाज जलील यांनी माफी मागावी,
करणार,
हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा या घोषणेची पूर्तता
गोमातेचा सन्मान केल्याबद्दल राज्य सरकारचे विश्व हिंदू परिषदेतर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.