परभणी : चोरट्यांनी घरासमोर लावलेली कार पळवली

 कार पळवली
कार पळवली

मानवत; पुढारी वृत्तसेवा घरासमोरील रस्त्यावर लावलेली मारुती कंपनीची डिझायर कार काल (गुरुवार) मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना पोलीस वसाहत रोडवर घडली. यामुळे परिसरात रहिवाशांमध्ये खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील व्यापारी संजय नंदलाल बांगड (वय ५८) यांचे पोलीस वसाहत परिसरात घर आहे. त्यांच्याकडे मारुती कंपनीची डिझायर कार क्रमांक एम एच २२ ए एम १११६ आहे. सदरील गाडीचे काही काम नसल्याने गेल्या ४ दिवसांपासून गाडी घरासमोरच उभी होती.

काल (शुक्रवार) पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास कार घरासमोर उभी नसल्याचे संजय बांगड यांना दिसून आले. याबाबत त्‍यांनी पोलीस ठाण्यात कार चोरीची तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास फौजदार भारत जाधव करीत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news