परभणी : अखेर पोलिसांनी ‘त्या’ नराधमांच्या मुसक्या आवळल्या

परभणी : अखेर पोलिसांनी ‘त्या’ नराधमांच्या मुसक्या आवळल्या

सेलू; पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील १० वर्षीय चिमुकलीचा अपहरण करून तिच्यावर अत्याचार करून पसार झालेल्या त्या दोन नराधमांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना अखेर यश आले. पोलिसांनी बुधवारी (दि. ७) सकाळी साडेअकराच्या सुमारास मच्छींद्र परमेश्वर घुले (वय २२), तुकाराम ज्ञानदेव घुले (वय २०) यांना राजेगाव (ता. जिंतूर) येथील शिवारात पाठलाग करून ताब्यात घेतले.

याबाबत अधिक माहिती अशी की, सेलू येथील १० वर्षीय चिमुकली आणि त्याच्या भावास दोन नराधमांनी फूस लावून आपल्या दुचाकीवर बसून वालूर मार्गे कौसडी येथे नेले. येथे त्यांनी चिमुकलीच्या भावास फाट्यावर सोडून दिले. त्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडित चिमुकलीवर कोक येथे जबरदस्तीने अत्याचार केला. दरम्यान, गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन परभणीचे पोलीस अधीक्षक जयंत मीना, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मुमाका सुदर्शन, यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी गोफने, स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक चव्हाण, पोलीस निरीक्षक दंतुलवार, सपोनि मुळे आदींनी आरोपींचा शोध घेण्यासाठी बोरी आणि जिंतूरच्या परिसरात सापळा लावला होता.

दरम्यान, पसार झालेले आरोपी जिंतूर आणि बोरी येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी तपासाची चक्रे अधिक गतिमान केली. पो. ना. पांडुरंग तूपसुंदर, मुकेश बुधवंत यांनी मोठ्या शिताफीने राजेगाव शिवारातून नराधमांना दुचाकीसह ताब्यात घेतले.

हेही वाचलंत का ? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news