परभणी: इसादच्या सरपंच सविता सातपुते यांचा राजीनामा; अनिल सातपुते यांची वर्णी लागणार

सविता सातपुते
सविता सातपुते
Published on
Updated on

गंगाखेड, पुढारी वृत्तसेवा: तालुक्यातील  इसाद ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सविता उद्धवराव सातपुते यांनी गुरुवारी (दि.१७) सायंकाळी अचानक मुदतपूर्व राजीनामा गटविकास अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला आहे. प्राप्त माहितीनुसार, अडीच- अडीच वर्षाच्या कालावधीसाठी राजकीय वाटाघाटीतून हा राजीनामा देण्यात आला आहे. ग्रामपंचायत सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल सातपुते यांची सरपंच पदावर निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे.

एकूण १३ सदस्य असलेल्या तालुक्यातील इसाद ग्रामपंचायतच्या सरपंचपदी अडीच वर्षांपूर्वी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्धवराव सातपुते यांच्या सौभाग्यवती सविता सातपुते यांची निवड झाली होती. कोरोना काळात सरपंच सविता सातपुते यांनी अतिशय उत्कृष्टपणे काम करून इसाद ग्रामस्थांना कोरोना प्रतिबंधक सुविधा मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिल्या होत्या. मागील अडीच वर्षात विविध योजनांतून विकासनिधी खेचून आणला.

राजकीय तडजोडीत अडीच- अडीच वर्षाच्या कालावधीसाठी सरपंचपदाची नियुक्ती तत्कालीन राजकीय परिस्थितीत झाली होती. त्यानुसार विद्यमान सरपंच सविता सातपुते यांनी आपला राजीनामा गुरुवारी गटविकास अधिकारी अंकुश चव्हाण यांच्याकडे सुपुर्द केला आहे. प्रशासकीय बाबी व पडताळणी पूर्ण केल्यानंतर हा राजीनामा प्रशासनाकडून मंजूर करण्यात येईल, अशी माहिती बीडीओ अंकुश चव्हाण यांनी दिली.

राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या इसाद गावाच्या सरपंच पदासाठी सदस्य तथा शिवसेनेचे तालुकाप्रमुख अनिल सातपुते यांचे नाव सर्वानुमते निश्चित करण्यात आले असल्याची माहिती आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news