परभणी : शेतीच्या फेरफारासाठी लाच मागणार्‍या महिला तलाठीवर गुन्हा

परभणी : शेतीच्या फेरफारासाठी लाच मागणार्‍या महिला तलाठीवर गुन्हा
Published on
Updated on

परभणी, पुढारी वृत्तसेवा : वडिलोपार्जीत शेतजमिनीचा हिस्सा महिलेच्या नावावर फेरफारद्वारे लावण्यासाठी 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी केल्यप्रकरणी रूमणा जवळा (ता.गंगाखेड) सज्जाच्या तलाठी शिल्पा किशनराव घाटोळ यांच्यावर येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी, रूमणा जवळा सज्जा अंतर्गत एका महिलेस न्यायालयाच्या आदेशानूसार तिच्या वडिलोपार्जीत शेतजमिनीचा हिस्सा मिळाला होता. हिश्याच्या या शेतजमिनीचा सातबारा उतार्‍यावर नोंद घेण्याबरोबरच त्याचा वारसा फेरफार करण्यासाठी महिलेच्या मुलाने तलाठी शिल्पा घाटोळ यांच्याकडे पाठपुरावा चालविला होता. परंतू तलाठी घाटोळ यांनी फेरफार लावून देण्यासाठी 20 हजार रूपयांच्या लाचेची मागणी महिलेच्या मुलाकडे केली. त्यावरून त्याने 21 मार्च रोजी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याशी संपर्क साधून याबाबतची तक्रार दिली होती. या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पथकाने दि.21 मार्च रोजीच लाचेची मागणी होत असल्याबाबत केलेल्या पडताळणीत ही बाब स्पष्ट झाली. त्यावरून तलाठी शिल्पा घाटोळ यांच्याविरूद्ध येथील नवा मोंढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लाचेच्या मागणीबाबतचा सापळा पोलिस उपअधिक्षक किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जकीकोरे, निरीक्षक सदानंद वाघमारे, हवलदार चंद्रशेखर निलपत्रेवार, मिलींद हनवते, शेख मुक्तार, चालक जूार्धन कदम यांनी लावला होता.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news