परांडा : कंडारी येथे चोरी; सोन्यासह रक्कमेची चोरी

परांडा : कंडारी येथे चोरी; सोन्यासह रक्कमेची चोरी

परांडा; पुढारी वृत्तसेवा : कंडारी (ता. परांडा) येथे मध्यरात्री चोरट्यानी कुलूपबंद घर फोडून चोरी झाल्याची घटना उघडकीस आली. ४ तोळे सोने व तब्बल १ लाख ७० हजारांची रोख रक्कम चोरी झाल्याची माहिती आहे. घटनास्थळी अंबी पोलीस ठाण्याचे कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली आहे.

कंडारी गावातील गणपती मंदीराजवळ राहणाऱ्या शरद शंकर जाधव यांच्या घरात ही चोरी झाली. जाधव यांची दोन मुले शेतामध्ये राहतात. जाधव व त्यांच्या पत्नी हे एका खोलीला कुलप लावून दुसऱ्या खोलीत झोपले होते. शनिवारी (दि. ५) रात्री दीड ते दोनच्या सुमारास अचानक जाग आल्याने जाधव यांच्या पत्नी बाहेर आल्या. यावेळी त्यांना त्यांच्या कुलुप तोडून खोलीत शिरलेले काही व्यक्ती आढळून आल्या. या अज्ञात व्यक्तींनी काळे कपडे परिधान करुन तोंड बांधलेली होते. ओट्यावर तोडलेले कुलूप दिसल्याने जाधव यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी पतीस आवाज दिला. तोपर्यंत घरातून तीन चोरांनी बाहेर धावा घेत धूम ठोकून पसार झाले.

चोरट्यांनी घराचे कुलुप तोडून

मध्यरात्री चोरट्यांनी कुलूपबंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातील गोदरजेची कपाटं उचकटून ४ तोळे सोने यामध्ये कर्णफुल, झुबे, नेकलेस, गंठण असा एकूण दोन लाखांचा ऐवज तसेच १ लाख ७० हजार रोख रक्कम चोरून नेली.

या घटनेची फिर्याद सुधीर शरद जाधव (वय ३४ वर्ष) यांनी दिली असून अज्ञातांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रांत हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली आनाळा बीट अंमलदार बाळासाहेब होडशीळ पुढील तपास करत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news