

Nanded Gram Panchayat Reservation
मुखेडः तालुक्यातील 129 ग्राम पंचायतीच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले. सरपंच पदाच्या 66 जागी महिला तर 63 जागी पुरुषांसाठी आरक्षण सोडत निघाली आहे. मुखेड तहसिल कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. उप विभागीय अधिकारी अनुप पाटील यांच्या मार्गदर्शाखाली ही सोडत प्रक्रिया घेण्यात आली.
जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त परिपत्रकानुसार 129 ग्रामपंचायतीचे आरक्षण निश्चित करण्यात आले आहे. टक्केवारीच्या उतरत्या क्रमाने हे आरक्षण काढण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार राजेश जाधव यांनी दिली होती.
अनुसुचित जातीसाठी 29 जागा असून त्यापैकी 15 जागांवर महिलांना प्रतिनिधीत्व मिळणार आहे. अनुसुचित जमातीसाठी 7 जागा आरक्षित असुन त्यापैकी 4 जागा महिलासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. इतर मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) साठी 28 जागा आरक्षित आहेत. त्यापैकी 14 जागा महिला सरपंचासाठी आरक्षित आहेत. खुल्या प्रवर्गासाठी 65 जागा असून त्यापैकी 33 जागा महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत.