Nanded Crime News : भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून गुरुनेच लुटली अब्रू
Nanded Crime News
Nanded Crime News : भोंदूबाबाचा महिलेवर अत्याचारfile photo
Published on
Updated on

Women harrasment by a fake maharaj

नांदेड, पुढारी वृत्तसेवा :

ज्या हातांनी आशीर्वाद द्यायचे, त्याच हातांनी एका महिलेचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा संतापजनक प्रकार नांदेडमध्ये उघडकीस आला आहे. गुरु-शिष्य या पवित्र नात्याला काळिमा फासत, लग्नाचे आमिष दाखवून एका भोंदू महाराजाने ४७वर्षीय महिलेवर अत्याचार केला. याप्रकरणी भाग्यनगर पोलिसांनी नराधम हरीगीर दत्तगीर गिरी (३८) याला अटक केली आहे. नाशिकच्या कॅप्टन खरात प्रकरणानंतर आता नांदेडमधील या घटनेने महाराष्ट्र पुन्हा एकदा हादरला आहे.

Nanded Crime News
Sexual assault case : विवाहितेस लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

श्रद्धेच्या नावाखाली वासनेचा सापळा

गाडीपुरा भागातील महंत बाळगीर महाराज मठ हा भाविकांच्या श्रद्धेचा केंद्रबिंदू. याच मठाचा प्रमुख अस-लेला हरीगीर महाराज याच्या संपर्कात पीडित महिला मे २०२५ मध्ये आली होती. मोबाईल नंबरची देवाणघेवाण झाल्यानंतर महाराजांने महिलेचा विश्वास संपादन केला. जून महिन्यात महिलेने त्याला गुरु मानले, मात्र याच श्रद्धेचा फायदा घेत नराधमाने वासनेचा सापळा रचला.

नराधम पोलिसांच्या कोठडीत

अखेर पीडित महिलेने हिंमत एकवटून भाग्यनगर पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी हरीगीर दत्तगीर गिरी याच्यावर कलम ६९ आणि ३५१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. धर्माच्या नावाखाली चालणाऱ्या अशा भोंदूगिरीमुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

Nanded Crime News
Beed Rape Case | १६ वर्षीय मुलीवर दोघांकडून पाशवी अत्याचार; आरोपींविरुद्ध 'पोक्सो' अंतर्गत गुन्हा दाखल

वाढदिवसाचे निमंत्रण अन् काळरात्र

स्वतःच्या वाढदिवसाचे निमित्त साधून महाराजांने पीडितेशी जवळीक साधली. लग्नाचे खोटे आमिष दाखवून तिच्या असहायतेचा फायदा घेत अत्याचार केला. जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा "मी संन्यासी आहे, लग्न करू शकत नाही; पैसे घे आणि प्रकरण मिटव, " अशी धमकी देऊन त्याने पीडितेच्या भावनांची क्रूर थट्टा केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news