

Wild animals are wreaking havoc in Dharmabad taluka
धर्माबाद, पुढारी वृत्तसेवा :
यंदा समाधानकारक पावसामुळे धर्माबाद शहरासह तालुक्यात शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने हरभरा, ज्वारी, गहू आणि भाजीपाल्याची लागवड केली आहे. शेतातील पिके जोमात असतानाच आता वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. माकडे, वानरे, हरीण, रोही आणि रानडुक्कर पिकांवर ताव मारत असल्याने रब्बी पिकांची मोठी नासाडी होत आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने वनविभागाने या प्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
रब्बी हंगामात हरभरा, ज्वारी आणि गहू ही महत्त्वाची पिके मानली जातात. बहुतांश शेतकऱ्यांकडे ओलिताची सुविधा नसल्याने ते निसर्गावर अवलंबून असतात. कष्टाने जगवलेली ही कोवळी पिके आता वन्यप्राणी फस्त करत आहेत. या प्राण्यांना हुसकावून लावण्यासाठी शेतकऱ्यांना ऐन कडाक्याच्या थंडीत रात्रीच्या वेळी शेतात जागरण (जागली) करावे लागत आहे. मात्र, हे वन्यप्राणी कशालाच जुमानत नसल्याने पिकांचे संरक्षण कसे करावे ? असा यक्षप्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे.
जारीकोट शिवारात वानरांचा उपद्रव
तालुक्यातील जारीकोट शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून उगवलेले पीक उध्वस्त केले जात आहे. सध्या हरभरा जोमात असून त्यावर वानरे ताव मारत आहेत. याबाबत बोलताना शेतकरी यशवंत कमलाकर जारीकोटकर म्हणाले, अगोदरच विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यात आता वन्यप्राण्यांमुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. वनविभागाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.जारीकोट शिवारात वानरांचा उपद्रव
तालुक्यातील जारीकोट शिवारात वन्यप्राण्यांचा वावर वाढला असून उगवलेले पीक उध्वस्त केले जात आहे. सध्या हरभरा जोमात असून त्यावर वानरे ताव मारत आहेत. याबाबत बोलताना शेतकरी यशवंत कमलाकर जारीकोटकर म्हणाले, अगोदरच विविध नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हैराण झाला आहे. त्यात आता वन्यप्राण्यांमुळे रब्बी हंगामही धोक्यात आला आहे. वनविभागाने याकडे गांभीयनि लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा.