Vanrai dam : वनराई बंधाऱ्यांमुळे शेतीसह वन्यप्राण्यांना बारमाही पाणी

हिमायतनगर तालुक्यात सात तर कोलंबीत एका वनराई बंधाऱ्याची निर्मिती
Vanrai check dam campaign
नरेंद्राचार्य महाराजांच्या कारला, कामारीतील सत्संग भक्तांनी तालुक्यात जवळपास सात वनराई बंधारे उभारले. तर नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे लोकसहभागातून व ग्रामस्थांच्या श्रमदानातून समृद्ध कोलंबी वनराई बंधारा उभारण्यात आला. pudhari photo
Published on
Updated on

हिमायतनगर/नायगाव ः जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यात वनराई कच्चे बंधारे बांधण्याची मोहीम 7 डिसेंबरपासून सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत हिमायतनगर तालुक्यातील कारला, कामारीतील भक्तांनी श्रमदानातून सात बंधारे उभारले आहेत. तर नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे लोकसहभागातून ‌‘समृद्ध कोलंबी‌’चा वनराई बंधारा उभारण्यात आला आहे. या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्याचा शेतीला फायदा होणार आहे.

जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून हिमायतनगर तालुक्यातील कारला, कामारीसह अन्य तीन गावांमध्ये सत्संग भक्तांनी प्रत्येकी पाच वनराई बंधारे उभारले आहेत. मुख्य नाल्यावर वनराई बंधारे उभारले असून या बंधाऱ्यात साठलेल्या पाण्यामुळे जवळपासच्या पिकासाठी मोठा फायदा होणार आहे.

Vanrai check dam campaign
Nanded News : वाडीतांड्यांवर सर्रास मिळते देशी-विदेशी दारू

या पवित्र कार्यात सत्संग मंडळाचे अध्यक्ष शिवाजी एटलेवाड, आनंद रासमवाड, दत्ता शिरफुले,इश्वर एटलेवाड, गणपत यमजलवाड, पांडुरंग यमजलवाड, मुकींद गोणेवाड, आशाताई बोयले, अर्चनाबाई चिंतलवाड, सुमनबाई इटेवाड, लक्ष्मीबाई रासमवाड, ज्योती रासमवाड या भक्तांनी पुढाकार घेतला.

‌‘समृद्ध कोलंबी‌’चा वनराई बंधारा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत नायगाव तालुक्यातील कोलंबी गावाने सामूहिक श्रमदान, लोकसहभाग आणि सामाजिक उत्तरदायित्वाचा उत्तम नमुना सादर करत गावालगतच्या ओढ्यावर वनराई बंधाऱ्याची उभारणी केली.

पाणीटंचाईच्या समस्येला गावकऱ्यांनी स्वतःच्या हातांनी उत्तर देत हा बंधारा पूर्ण केला. वनराई बंधारा हा नैसर्गिक साधनसंपत्तीचे संवर्धन आणि मृदसंधारणासाठी उपयुक्त असा कच्चा पण प्रभावी उपाय असून पाणी संचयन वाढवणे, भूजल पातळी सुधारणा आणि शेतीला सहाय्यक वातावरण तयार करणे हे यामागील मुख्य उद्दिष्ट आहे. कोलंबी ग्रामस्थांनी “पाणी वाचवा, पाणी साठवा” या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत उत्स्फूर्त सहभागातून बंधारा उभारून लोकसहभागाचे सामर्थ्य दाखवून दिले.

Vanrai check dam campaign
Beed News : कड्याच्या बंधाऱ्याकडे अक्षम्य दुर्लक्ष!

अभियानांतर्गत कोलंबीमध्ये विविध विकास उपक्रम राबवले जात असताना लोकसहभागातून केलेला हा प्रकल्प विशेष ठरला आहे. बंधाऱ्यामुळे आगामी काळात शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना पाणीपुरवठा व सिंचनासाठी मोठा आधार मिळणार आहे.

या उपक्रमात सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत अधिकारी, सदस्य, तलाठी, कृषी सहाय्यक, गावातील सर्व विभागांचे कर्मचारी, महिला-पुरुष ग्रामस्थ अशा मोठ्या संख्येने उपस्थिती लक्षणीय होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news