

University Answer Sheets to be Evaluated Using a Face Reading System!
महेश राजे
नांदेड : विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी यंदा तब्बल ९८ ऑनस्क्रीन व्हॅल्यूएशन सेंटर स्थापन करण्यात आले होते. यामुळे ३० दिवसांच्या आत १७ विद्याशाखांचे निकाल लागू शकले; परंतु पुढील वर्षी पद्धत आणखी सोपी, गतीमान, अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी फेस रिडींग आधारित सॉफ्टवेअरची मदत घेत उत्तरपत्रिका तपासणीस प्राध्यापकांना केव्हाही, कुठेही त्या तपासता याव्यात अशी सुविधा उपलब्ध करण्याची तयारी विद्यापीठ स्तरावर सुरू असल्याची माहिती प्राप्त झाली.
यावर्षी विद्यापीठाने उत्तरपत्रिका तपासण्याची पद्धत अधिक सुलभ करताना कार्यक्षेत्रातील विविध महाविद्यालयात तब्बल ९८ ऑनस्क्रीन व्हॅल्युएशन सेंटर स्थापन केले. यामुळे विद्यापीठाचे सुमारे २ हजार ५०० प्राध्यापक तपासणीसांच्या प्रवास व जेवण भत्त्यावर खर्च होणारे कोट्यवधी रुपये वाचले; परंतु प्रत्येक उत्तर पत्रिकेच्या स्कॅनिंगसाठी १९ रुपये व उत्तर पत्रिका हाताळणी व सुरक्षेसाठी परीक्षा केंद्राला प्रति उत्तरपत्रिका सात रुपये देण्यात आले.
तरी देखील मोठ्या प्रमाणात पैशांची बचत तर झालीच परंतु त्यापेक्षाही उत्तर पत्रिकांची सुरक्षा, ४०-४० चे गड्ढे बांधणे, मास्किंग करणे, वाहतूक, तपासल्यानंतर डीमास्किंग करणे याची आता गरज उरली नाही. तसेच आता त्या पीडीएफ स्वरुपात उपलब्ध झाल्याने मागेल त्याला आवश्यक सोपस्कार पूर्ण करून संबंधितांच्या मेल आयडीवर ती पाठवणे सहज सुलभ झाले. शिवाय कितीही वर्ष उत्तर पत्रिका जपून ठेवणे सोपे झाले. पूर्वी निकालानंतर सहा महिन्यापर्यंत जपून ठेवण्याचा व नंतर त्याची विल्हेवाट लावण्याचा द्राविडी प्राणायाम करावा लागत असे.
पदवी स्तरावरील बी.ए., बी. कॉम, बीबीए (एबीएम), बीसीए, बीसीएस, बी.एड., बी.पी एड. आणि बी. व्हॉक, (एमएलटी) या अभ्यासक्रमांसह पदव्युत्तर स्तरावरील एम. कॉम, एम.एस्सी. (फिशरी सायन्स), एमसीए, एम.एड., एम.पी.एड., एमएसडब्लू, डीएमएम तसेच सर्व एम. व्हॉक. या विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या १७ महत्वपूर्ण अभ्यासक्रमांचे निकाल अवघ्या ३० दिवसांच्या आत जाहीर करण्यात विद्यापीठाच्या परीक्षा विभागाला यश आले.
सुमारे ८ लाख उत्तरपत्रिका विद्यापीठाच्या यंत्रणेने तपासल्या. आणखी फार्मसी व एक्सटर्नल परीक्षा अद्याप व्हायच्या आहेत. त्याच्या सुमारे ४० हजार उत्तरपत्रिका होतील. नव्या पद्धतीमुळे उन्त्रपत्रिकांची सुरक्षा व निकालातील पारदर्शकतेची होणार आहे. पातळी खूप वाढली आहे. वेळेत निकाल जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रिया, स्पर्धा परीक्षा रोजगाराच्या संधी तसेच करिअर नियोजनासाठी मोठी मदत पूर्वी विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका संबंधित तपासणीस प्राध्यापकाच्या हवालीकेल्या जात असत, अशा पद्धतीत त्याच्या कुटुंबातीलकोणीही त्या तपासत शिवायकाही धाढ्य विद्यार्थी त्याचा माग काढत त्या प्राध्यापकाच्या घरी पोहोचून व्यवहार किंवा दुर्व्यवहार करुन हवा तसा निकाल लावू घेत.
याबाबत सार्वत्रिक ओरड व टिकाटिप्पणी होऊ लागल्याने विद्यापीठाने सर्व संबंधित प्राध्यापकांना विद्यापीठात येवून पेपर अर्थात उत्तरपत्रिका तपासण्याची व्यवस्था केली. त्यासाठी प्रत्येकाला प्रवास खर्च (टी.ए.) व जेवण भत्ता (डी.ए.) दिला जात असे. ही पद्धत खर्चिक व वेळखाऊ होती. उत्तरपत्रिका तपासणाऱ्यांच्या वैयक्तिक अडचणी व प्रवासातील किचकटता यामुळे वेळेचा फार अपव्यय होऊन निकाल लागण्यात कमालीचा विलंबहोत असे.
परिणामी विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीचे नियोजन करणे कठिणहोत असे; पण, आता त्यात खूप सुसुत्रता व पारदर्शकता आली आहे. पुढील वर्षी फेस ररिडींगआधारे उत्तर पत्रिका तपासण्याचा कुलगुरू मनोहर चासकर, प्र कुलगुरू व व्यवस्थापकीय परिषद यांचा मानस पूर्णत्वास गेल्यास वेळेची आणखी बचत होऊन परीक्षा झाल्यानंतर पंधरवड्यात निकाल घोषित होऊ शकतो.