

Two Wheeler Accident Umri
उमरी: दुचाकीवरून दोघे जण हंगिरगा येथून आपल्या रहाटी गावाकडे जात असताना रस्त्यावरच त्यांच्या दुचाकीचा अपघात झाला. या अपघातात संभाजी विठ्ठल लांडगे (वय 45, रा. रहाटी, ता. उमरी) यांचा जागीच मृत्यू झाला. तर विश्वंभर सदाशिव लांडगे हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या नांदेड येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
ही घटना उमरी तालुक्यातील रहाटी फाट्याजवळ मंगळवारी सायंकाळी साडे सहा ते सात वाजण्याच्या सुमारास घडली. ऐन गणेशोत्सवाच्या काळात ही घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, भाऊ असा परिवार आहे.