

मुखेड: पाच वर्ष काँग्रेसचे नगराध्यक्ष होते व चार वर्ष प्रशासकराज होता, त्यामुळे विकासकामाला खिळ बसली आहे. शहरात अस्वच्छता वाढली असून, मागील 9 वर्षातील ह्या दोषाचे खापर भाजपावर फोडुन विरोधक खोटा नेरेटिव्ह पसरवत आहेत.
त्यामुळे सुजान मतदारांनो जागरुकतेने खरे खोटे समजुन घ्या विरोधकाच्या अरोपाला जासाश तसे उ-तर देण्यासाठी भाजपाला एकहाती स-ता द्या. पॅनल टु पॅनल मतदान करुन नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांना विजयी करा, मुखेड शहर विकासाचे प्रश्न सोडवण्याची जबाबदारी माझी असा शब्द आ. डाॅ. तुषार राठोड यांनी दिला. मी जे बोलतो ते करतो त्यामुळे विकास प्रश्नाची जबाबदारी माझी भाजपाला एकहाती स-ता देण्याची जबाबदारी तुमची असे आवाहन ही आ.डॉ. तुषार राठोड यांनी केले.
मुखेड शहर मागील 9 वर्षात विकासापासून वंचित राहीला आहे. भाजपाची स-ता आल्यानंतर विकासाचा अनुषेश भरुन काढु, केंद्र व राज्यात भाजपा सरकार असल्याने विकास कामाला निधी कमी पडणार नाही, असे ही त्यांनी बोलताना स्पष्ट केले. शहराच्या पायाभूत सुविधांसाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही देवून, मुखेड शहरात सेवानिवृतासाठी माजी सैनिकासाठी, पत्रकारांसाठी, वैद्यकीय व्यवसायिकांसाठी व शिक्षकांसाठी भवन बांधणार असल्याचेही म्हणाले. 9 वर्षाचा विकास अनुषेश भरुन काढण्यासाठी परिश्रम घेण्याची माझी तयारी आहे. तशी मतदारांनी 20 तारखेला भाजपाचे नगराध्यक्ष व सर्व नगरसेवकाना विजयी करण्यासाठी परिश्रम घेवुन भाजपाचे हात बळकट करा असे आवाहन त्यांनी केले.