Nanded News : औद्योगिक वसाहतीचा खेळखंडोबा; अनेक उद्योगांना जागाच नाही

औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योगांसाठी जागा नाही; पण दुसरीकडे १० ते १५ एकर जागा असलेले अनेक उद्योग बंद पडून आहेत.
Nanded News
Nanded News : औद्योगिक वसाहतीचा खेळखंडोबा; अनेक उद्योगांना जागाच नाहीfile photo
Published on
Updated on

There is no space for new industries in the industrial estate

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : औद्योगिक वसाहतीत नवीन उद्योगांसाठी जागा नाही; पण दुसरीकडे १० ते १५ एकर जागा असलेले अनेक उद्योग बंद पडून आहेत. काही जागा प्रभावशाली राजकीय व्यक्तींशी संबंधित असल्याचीही चर्चा आहे. त्यातच एकेका प्लॉटचे ३ ते ४ कोटी रुपयांना व्यवहार होत असल्याने औद्योगिक वसाहतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Nanded News
Digital Arrest Scam : डिजिटल अरेस्टचा धाक दाखवत ज्येष्ठाला १५ लाखांचा गंडा

उद्योजकांच्या प्रश्नांसाठी असलेले 'चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज' गेल्या १५ वर्षांपासून निष्क्रिय असल्याची उद्योजकांची नाराजी आहे. तेच पदाधिकारी, तेच अध्यक्ष आणि सुसज्ज कार्यालय असूनही नियमित बैठका नाहीत. आणखी दोन संघटना आहेत; मात्र एकीच्या अभावामुळे उद्योगांचे प्रश्न जैसे थे! प्रिकास्ट क्लस्टरसारखी मोठी संधीही आपसातील देणे-घेणे आणि अंतर्गत वादांमुळे हातातून गेली. अग्रो-बेस्ड उद्योगांना मोठी क्षमता असताना इच्छाशक्तीचा अभाव आहे.

दरम्यान, एमआयडीसी कार्यालयात पैसे दिल्याशिवाय कामे होत उद्योजक करत आहेत. औद्योगिक वसाहतीतील तक्रारीही पोलिसांकडून घेतल्या जात नसल्याचा आरोप आहे. उद्योग वाढवायचे की प्लॉटचे व्यवहार? एकीकडे जागेसाठी नवीन उद्योजकांची धावपळ, दुसरीकडे कोट्यवधींचे प्लॉट व्यवहार आणि तिसरीकडे निष्क्रिय संघटनाही औद्योगिक वसाहत आहे की व्यवस्थेचा बाजार? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

Nanded News
Nanded Crime | विश्रामगृहात महिलेचा विनयभंग ; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

उद्योजकांच्या प्रश्नांवर तातडीने एमआयडीसी, पोलीस प्रशासन आणि संबंधित संघटनांनी संयुक्त बैठक घेऊन ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा उद्योगांच्या नावाखाली सुरू असलेल्या या खेळखंडोब्याचा पर्दाफाश करण्यासाठी उद्योजकांना रस्त्यावर उतरावे लागेल, अशा संतप्त प्रतिक्रिया आता पुढे येत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news