जि. प. अधिकाऱ्यांवर न्यायालयीन अवमान कारवाईची टांगती तलवार

सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाची तीव्र प्रतिक्रिया
ZP Nanded
ZP Nanded file photo
Published on
Updated on

There is a strong possibility of contempt of court action against zp officers

श्रीक्षेत्र माहूर, पुढारी वृत्तसेवा : तब्बल अकरा वर्षे माहिती दडपून ठेवल्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने ११ फेब्रुवारी रोजी झालेल्या सुनावणीत माहिती अधिकार कायद्याची पायमल्ली आणि उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन न केल्या प्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करुन प्रथमदर्शनी न्यायालयाचा स्पष्ट अवमान असा ठपका ठेवला आहे. त्यामुळे नांदेड जिल्हा परिषदेच्या विद्यमान मुख्यकार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी (माध्यमिक) यांच्यावर न्यायालयीन अवमानाची कारवाई होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.

ZP Nanded
नांदेडच्या देळूबमध्ये एका - घरावर जमावाचा हल्ला

जिल्हा परिषद नांदेड माहूर-किनवट तालुक्यातील एका टायपिंग संस्थेला मान्यता देताना बनावट प्रमाणपत्रे व बोगस कागदपत्रांचा आधार घेतल्याची तक्रार याचिकाकर्ते गजानन अंबादास शिंदे यांनी २०१५ मध्ये केली होती. या संदर्भातील मूळ संचिका व संबंधित कागदपत्रांची माहिती मिळवण्यासाठी त्यांनी माहिती अधिकाराखाली अर्ज दाखल केला होता.

परंतु जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने संबंधित माहिती उपलब्ध करून न देता तब्बल ११ वर्षे ती दडपून ठेवल्याचा त्यांनी आरोप केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळाले नसल्याने शिंदे यांनी न्यायालयीन लढाईचा मार्ग स्वीकारला. २०१७ मध्ये राज्य माहिती आयोगाने माहिती न दिल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांवर दंड ठोठावला होता. तरीही प्रत्यक्ष माहिती देण्यात आलेली नाही, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.

ZP Nanded
Illegal Sand Mining | धर्माबाद पोलिसांची मोठी कारवाई: अवैध रेती वाहतूक करणारे दोन हायवा जप्त; २८.५ लाखांचा मुद्देमाल जप्त

या पार्श्वभूमीवर त्यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठात धाव घेतली. न्यायालयाने २१ जानेव-ारी २०२६ रोजी १५ दिवसांच्या आत संपूर्ण माहिती देण्याचे स्पष्ट आदेश दिले होते. मात्र प्रशासनाने या आदे-शाचेही पालन न केल्याची गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने प्रशासनाच्या टाळाटाळीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

न्यायालयाने संबंधित अधिकाऱ्यांना पुढील सुनावणीस मूळ संचिका व सर्व रेकॉर्डसह प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. ही सुनावणी २५ फेब्रुवारी २०२६ रोजी होणार असू या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news