

The race for the post of mayor of Kandahar Municipal Council has begun.
कंधार : कंधार नगर परिषदेच्या अध्यक्षपदाचे आणि प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यामुळे कंधार नगरपरिषदेचा अध्यक्ष कोण, याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे. नोव्हेंबर २०२५ मध्ये नगरपालिकेच्या निवडणुका होण्याची शकता वर्तवली जात आहे. त्यामुळे कार्यकल्पांमध्ये हालचालींना वेग आला. आहे. कार्यकर्ता आपापला कोणता प्रभाग सोचीचा राहील यानी चाचपणी भावी नगरसेवक करीत आहेत.
कंधार शहरात महायुती आणि महाविकास आषाडी आणि वंचित बहुजन आषाडी हे तीन राजकीय पक्ष आहेत. महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदेची शिवसेना आणि राष्ट्रबादी काँग्रेस अजित पवार दादा गट यांची महायुती आहे. तर महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, उद्धव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) आणि शरद पवार (राष्ट्रवादी काँग्रेस) यांची महाविकास आघाडी आणि स्वतंत्र वंचित बहुजन आपाती आहे.
माजी नगरसेवक शहाजी मळगे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे नगर परिषदेच्या अध्यक्षपदाची उमेदवारी मागितली आहे. शहाजी नळगे हे तरुण तडफदार उमेदवार असून त्यांना राजकीय वारसा आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष अरविंद दादा नळगे यांनी कंधार नगरपरिषदेचे अनेकवेळा नगराध्यक्ष पद भूषविले आहे. तर शहाजी नळगे यांच्या मातोश्री शोभाताई नळगे यांनीही नगराध्यक्ष पद भूषविले आहे. माजी नगर उपाध्यक्ष मत्रन चौधरी यांनीही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडे नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागितली आहे. मनान चौधरी गेल्या २० ते २५ वर्षापासून कंधार नगरपरिषदेच्या राजकारणात सक्रिय आहेत. ते राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून, ते अनेकवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहे. त्यांचा शहरात दांडगा जनसंपर्क आहे.
स्वप्निल पाटील लुंगारे यांनाही राजकारणाचा मोठा चारसा आहे. त्यांच्या मातोश्री कमलाबाई लुंगारे यांनी कंधार नगरपरिषदेचे अध्यक्ष पद भूषवले आहेत. कंधार-लोहा मतदारसंघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे ते कट्टर समर्थक आहेत. स्वप्निल पाटील लुंगार यांचा मित्र परिवार दांडगा आहे. अनुसया चेतन केंद्रे यांचे नाव अध्यक्षपदासाठी पुढे येत आहे. त्यांनी एक वेळेस कंधार शहराचे नगराध्यक्ष पद भूषवले आहे. त्यांना शहरात मानणारा मोठा वर्ग आहे. कंधार शहराला स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
प्रफुल बडवणे हे कंधार शहरात सर्वसामान्यांना परिचित असलेले ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. त्यांनी अनेक वेळा कंधार नगरपरिषदेचे नगरसेवक होते. हशार राजकारणी म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, डॉ. दीपक बनवणे हे व्यवसायाने डॉक्टर असले तरी ते सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर आहेत. कंधार नगरपरिषदेने ते नगरसेवक होते. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिल्यास मी अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
असेफ शेख कंधार शहरात तरुण कार्यकर्ता आहे. सामाजिक कार्यात पुढे येऊन काम करतात. सर्वसामान्याच्या अडीअडचणी सोडवण्याचा सतत प्रयत्न करीत असतात. त्यांच्या मातोश्री कंधार नगरपरिषदेच्या नगरसेविका होत्या. अशेफ शेख हे कंधार लोहा मतदारसंघाचे आ. प्रताप पाटील चिखलीकर यांचे कट्टर समर्थक आहेत. अड, गंगाप्रसाद येत्रावर हे भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते असून कंधार शहराध्यक्ष आहेत.
जनतेतून नगराध्यक्ष निवडायचा असल्यामुळे कोणत्याच पक्षाला ही निवडणूक सोपी जाणार नाही. महायुतीच्या वतीने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार व निवडणूक लढवायचे ठरले, तर कार्यकर्त्याच्या अंतर्गत लाथाळीमुळे महायुतीमध्ये एकमेकांचे पाय ओढण्याची भीती अनेकांना वाटत आहे. तीच परिस्थिती महाविकास आघाडीमध्येही दिसून येत आहे. पक्षातील कार्यकर्त्यांचा एकमेकांवर विश्वास राहिला नाही. वंचित बहुजन आघाडीचीही तीच अवस्था आहे. सध्या कंधार शहरात कोणताही राजकीय पक्ष प्रबळ नाही,