Nanded News : ढोल-ताशांचा गजर अन् भक्तीचा महापूर; दुर्गादेवीचे स्वागत !

नऊ दिवस चालणार आदिशक्तीचा जागर उत्सव
Nanded News
Nanded News : ढोल-ताशांचा गजर अन् भक्तीचा महापूर; दुर्गादेवीचे स्वागत !file photo
Published on: 
Updated on: 

The nine-day festival celebrating the divine feminine power (Adishakti) will take place

नांदेड, पुढारी वृत्तसेवा आनंद आणि मांगल्याचा उत्सव असलेल्या शारदीय नवरात्रोत्सवाला अत्यंत उत्साहात सुरुवात झाली असून, सार्वजनिक मंडळांसह घरोघरी आदिशक्ती दुर्गादेवीचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यंदा देवीचे आगमन हत्तीवरून (गजावरून) झाले असून, हे सुख-समृद्धी आणि शांततेचे प्रतीक मानले जात असल्याने यानिमित्त प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

Nanded News
Nanded Crime : तब्बल २५ वर्षांपासून फरार आरोपी अमरावतीतून जेरबंद!

रविवारच्या शुभ मुहूर्तावर विविध सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळांनी ढोल-ताशांच्या गजरात, पारंपरिक लेझिम पथकांच्या तालावर आणि गुलालांची उधळण करत देवीच्या मूर्तीचे आगमन सोहळे पार पाडले. नांदेड शहरासह जिल्ह्यातील सर्वच लहान-मोठ्या शहरांमध्ये काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तरुणाईने पारंपरिक पोशाख परिधान करून मिरवणुकांमध्ये मोठा सहभाग नोंदवला आणि नृत्याचा आनंद घेतला. घटस्थापनेची लगबग घरोघरी घटस्थापना करण्यासाठी आणि पूजेच्या साहित्यासाठी बाजारपेठांमध्ये सकाळपासूनच नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळाली. झेंडूची फुले, सुटी फुले, फळे, पूजा साहित्य आणि मातीचे घट खरेदी करण्यासाठी बाजारपेठा गजबजून गेल्या होत्या.

शुभ मुहूर्तावर मंत्रोच्चाराच्या सुरात घरोघरी घट बसवून घटस्थापना करण्यात आली आणि नऊ दिवसांच्या अखंड उपवासाला व पूजेला प्रारंभ झाला. शहरातील देवींच्या प्रमुख मंदिरांना अतिशय आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची देखणी सजावट करण्यात आली आहे. भाविकांना दर्शनाचा लाभ सुलभतेने घेता यावा यासाठी देवस्थान समित्यांनी आणि स्थानिक प्रशासनाने चोख व्यवस्था ठेवली आहे.

Nanded News
Nanded News : अवैध रेती माफियांवर पोलिसांची धडक कारवाई; २ कोटी १९ लाखांचा मुद्देमाल जप्त

शहरातील होळी-सराफा, जुना मोंढा, वजिराबाद, शिवाजीनगर, श्ररीनगर, वर्कशॉप, भाग्यनगर, आनंदनगर, गणेशनगर, वामननगर तसेच तरोडा परिसरात विविध मंडळांच्यावतीने नवरात्रीच्या पहिल्याच माळेपासून विविध सोसायट्या आणि मैदानांवर गरबा आणि दांडिया नृत्याचे आयोजन करण्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात दुष्काळाचे संकट असले तरी गणेशोत्सवाप्रमाणेच नऊ दिवस चालणाऱ्या या आदिशक्त्तीच्या जागर उत्सवामुळे संपूर्ण वातावरणात चैतन्य आणि सकारात्मक ऊर्जा पसरल्याचे दिसून येत आहे.

माहूरसाठी १२० बसेस

माहूरगडावर भाविकांच्या वाहतुकीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या १२० बसेस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती आगार प्रमुख चंद्रशेखर समर्थवाड यांनी दिली. भाविकांच्या सुरक्षेसाठी ५०० हून अधिक पोलीस अधिकारी, कर्मचारी व होमगार्ड तैनात करण्यात येणार असून, गर्दी नियंत्रण, दर्शन रांगा आणि वाहतूक व्यवस्थेवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news