Transformers Fire : दहा रोहित्र जळाले

अर्धे गडगा गाव अंधारात, विजेचा खेळखंडोबा
Transformers Fire
दहा रोहित्र जळालेpudhari photo
Published on
Updated on

नायगाव : गडगा येथील तेली डीपी, महादेव डीपी, जिल्हा परिषद शाळा डीपी, मांजरम रस्ता परिसरातील डीपी अशा एकूण 10 सिंगल फेज डीपी गुरुवारी दि. 8 रोजी जळाल्या. त्यामुळे अनेक दिवसांपासून वीजपुरवठा सतत खंडित होत होता. कमी दाबाचा वीजपुरवठा कसाबसा सुरू असतानाच आता एकाचवेळी सर्व डीपी जळाल्याने अर्धे गाव अंधारात गेले आहे.

गावातील स्विच बॉक्स, केबल, किटकॅट यांची अवस्था अत्यंत दयनीय असून त्याचा थेट परिणाम वीजपुरवठ्यावर होत आहे. मुख्य रस्त्यावरील जुने व जीर्ण लोखंडी खांब कधीही कोसळण्याची शक्यता निर्माण झाली असून संभाव्य अपघाताची भीती नागरिकांत आहे.

Transformers Fire
हा रस्ता का? छे. हो…घसर गुंडी, टाकळीमानूर-करोडी रस्त्याची दुर्दशा; 18 किलोमीटरचा रस्ता अत्यंत धोकादायक

विशेष म्हणजे, ग्रामपंचायत कार्यालयासमोर असलेल्या डीपीचा स्विच बॉक्स अवघ्या तीन फूट उंचीवर असल्याने येथे गंभीर दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच ठिकाणी अंगणवाडी क्रमांक 4 भरवली जाते, त्यामुळे लहान चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Transformers Fire
Parbhani News : परभणीतील संविधान प्रतिकृती विटंबना प्रकरणातील आरोपीने जीवन संपवले

तसेच गडगा-कंधार रस्त्यावर गावालगत रस्ता क्रॉस करणाऱ्या वीजवाहिन्यांना ऊस वाहतूक करणारे ट्रक व कंटेनर लागत असून हा प्रश्न शेतकऱ्यांनी वारंवार महावितरण अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. मात्र केवळ आश्वासनांपलीकडे कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त शेतकऱ्यांनी लाकडांच्या सहाय्याने तात्पुरता टेकू देत स्वतःच उपाय केला आहे. हा उपाय तांत्रिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक असूनही महावितरणने याकडे पूर्णतः दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news