

हणेगाव : मरखेल येथील शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थिनीवरच शिक्षकाने वाईट नजर ठेवून तिच्या आईच्या मोबाईलवर मेसेज करून छळवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात त्या शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला. शिक्षकी पेशाला काळीमा फासणाऱ्या या निंदनीय घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे.
तालुक्यातील मरखेल येथील शाळेत शिक्षक पदावर कार्यरत असलेला सदानंद विद्यासागर भुताळे हा शिक्षक दहाव्या वर्गात शिकत असलेल्या एका अल्पवयीन मुलीस मागील एक महिन्यापासून लैंगिक उद्देशाने मोबाईलवर मेसेज करत त्रास देत होता. तिचा पाठलाग करून तिची छळवणूक करत होता. पीडित मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून याप्रकरणी मरखेल पोलीस ठाण्यात संबंधित शिक्षकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मरखेल पोलीस करीत आहेत.