काळ आला होता पण वेळ आली नव्हती! वादळी वाऱ्यासह घरावर कोसळला ४ किलोचा दगड ; बाप-लेक थोडक्यात बचावले

काळ आला होता पण वेळ आली नव्हती! वादळी वाऱ्यासह घरावर कोसळला ४ किलोचा दगड ; बाप-लेक थोडक्यात बचावले
Published on
Updated on

मुखेड : 'देव तारी त्याला कोण मारी' या उक्तीचा प्रत्यय देणारी एक थरारक घटना मुखेड शहरातील शिवाजीनगर भागात घडली आहे. ३० तारखेच्या मध्यरात्री सुटलेल्या वादळी वाऱ्यात एका हॉटेल व्यावसायिकाच्या घरावर दगड आणि सिमेंटचा पाईप कोसळला. सुदैवाने, अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने घरमालक आणि त्यांची गरोदर मुलगी या भीषण अपघातातून सुखरूप बचावले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजीनगर भागातील हॉटेल व्यावसायिक संजय चाफेकर हे रात्री आपल्या गरोदर मुलीसह घरी होते. त्यांची पत्नी आणि मुलगा कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. रात्री साडेअकराच्या सुमारास शहरात जोरदार वादळी वारा सुरू झाला आणि वीजपुरवठा खंडित झाला. संपूर्ण परिसरात अंधाराचे साम्राज्य असतानाच चाफेकर यांच्या घराच्या छतावर काहीतरी पडल्याचा आणि पत्रे वाजल्याचा प्रचंड आवाज झाला.

लाईट लावण्यासाठी उठले अन् जीव वाचला

नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी संजय चाफेकर अंथरुणातून उठले आणि लाईट लावण्यासाठी पुढे सरसावले. ते जागेवरून हलले आणि त्याच क्षणी छताचा पत्रा फोडून अंदाजे ४ किलो वजनाचा एक मोठा दगड आणि सिमेंट-वाळूने भरलेला एक पीव्हीसी पाईप थेट त्यांच्या झोपण्याच्या जागी कोसळला. जर चाफेकर उठले नसते, तर हा दगड थेट त्यांच्या अंगावर पडला असता.

गर्दीने धावून आले शेजारी

घराच्या छतावर इतरही दोन-तीन मोठे दगड अडकून पडले होते. ज्या ठिकाणी हा दगड पडला, त्याच्या अगदी काही अंतरावरच त्यांची गरोदर मुलगी झोपलेली होती. या भीषण आवाजामुळे आणि चाफेकर यांच्या ओरडण्यामुळे परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांच्या घराकडे धाव घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news