नांदेड लोकसभा समन्वयकपदी श्याम दरक यांची नियुक्ती

नांदेड लोकसभा समन्वयकपदी श्याम दरक यांची नियुक्ती
nanded news
नांदेड लोकसभा समन्वयकपदी श्याम दरक यांची नियुक्तीpudhari photo
Published on
Updated on

नांदेड : अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने राज्यातील सर्व लोकसभा क्षेत्रासाठी नेमलेल्या निरीक्षकांसोबत कामकाजासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सर्व लोकसभा क्षेत्राकरिता नुकतीच समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे. दरम्यान प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार प्रदेश काँग्रेसच्या वतीने नांदेड लोकसभा समन्वयकपदी श्याम दरक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या वतीने राज्यातील सर्व लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. नांदेड लोकसभा निरीक्षकपदी तेलंगणा येथील खा. सुरेशकुमार शेटकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निरीक्षकांसोबत कामकाज करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने सर्व लोकसभा क्षेत्रात समन्वयकांची नेमणूक करण्यात आली आहे.

दरम्यान नांदेड लोकसभा समन्वयकपदी ज्येष्ठ पदाधिकारी तथा प्रदेश काँग्रेस सहसचिव श्याम दरक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश काँग्रेस प्रभारी रमेश चेन्निथला यांच्या आदेशानुसार व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार प्रदेश काँग्रेसच्या वतीने सदर नियुक्ती करण्यात आली आहे.

या निवडीबद्दल जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, उत्तर जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, महानगराध्यक्ष अब्दुल सत्तार आर्दीसह स्थानिक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांनी श्याम दरक यांचे अभिनंदन केले आहे.

nanded news
राष्ट्रपती निवडणूक : शिवसेनेकडून भावना गवळींची लोकसभा प्रतोदपदावरून उचलबांगडी! राजन विचारे यांची नियुक्ती

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news