उमरखेड : प्रशांत भागवत
यंदा श्रावणात पाच सोमवार (Shravan Somvar 2024) असणार आहेत. यावेळी ७२ वर्षांनंतर श्रावण महिन्यात हा दुर्मिळ योगायोग तयार होत आहे. विशेष म्हणजे, श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी होत आहे. सनातन हिंदू धर्मात श्रावण महिना अत्यंत पवित्र मानला जातो. या महिन्यात शंकर आणि माता पार्वतीची भक्तिभावाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, असं म्हटलं जातं. (Shravan 2024)
उत्तर भारतीय पंचांगानुसार यंदा २२ जुलैपासून (सोमवार) श्रावण महिना सुरू होणार आहे आणि 19 ऑगस्टला संपणार आहे. तर मराठी पंचांगानुसार ५ ऑगस्टपासून श्रावणाची सुरुवात होत आहे. श्रावणाची सुरुवात आणि शेवट दोन्हीही सोमवारी असण्याचा दुर्मिळ योग ७२ वर्षांपूर्वी तयार झाला होता. २७ जुलै १९५३ रोजी सोमवारी श्रावण महिना सुरू झाला होता. यावेळी श्रावणामध्ये सहा शुभयोगही तयार होत आहेत. यंदा श्रावण महिन्यात शुक्रादित्य योग, बुधादित्य योग, नवपंचम योग आणि गजकेसरी योग तयार होत आहेत.(Shravan 2024)
या शिवाय कुबेर योग आणि षष्ठ योगही तयार होत असल्याने या महिन्याचे महत्व अधीकच वाढले आहे. सर्वार्थ सिद्धीसह श्रावणात तीन शुभयोगांची सुरुवात श्रावणाचा पहिला दिवस सोमवार आहे. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. या योगात श्रावणाला सुरुवात होणं, अत्यंत शुभ मानलं जातं. सर्वार्थ सिद्धीयोगात श्रावणी सोमवारचा उपवास केल्याने शंकराचा विशेष आशीर्वाद मिळतो अशी श्रध्दा आहे.(Shravan 2024)
सर्वार्थ सिद्धी योगात रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास व्यक्तीला अपेक्षित फळ मिळतं. पहिल्या सोमवारी प्रीती, आयुष्मान आणि सर्वार्थ सिद्धी योग या तीन मोठ्या योगांची सुरुवात होत आहे. हा प्रकार अत्यंत शुभ मानला जात आहे.(Shravan 2024)
यंदा श्रावणात अनेक शुभयोग तयार होत आहेत. त्यामुळे महादेव बहुतांश राशीच्या लोकांच्या इच्छा पूर्ण करतील अशी भक्तांची भावना आहे. कोणताही शिवभक्त आशीर्वादापासून वंचित राहणार नाही. पहिला श्रावणी सोमवार - २२ जुलै २०२४. दुसरा श्रावणी सोमवार - २९ जुलै , तिसरा श्रावणी सोमवार - ५ ऑगस्ट. चौथा श्रावणी सोमवार - १२ ऑगस्ट, पाचवा श्रावणी सोमवार - १९ ऑगस्ट असणार आहे.(Shravan 2024)