Sand Mafia : नांदेडात वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्या

८७ लाखांचा मुद्देमाल जप्त; चार आरोपी अटकेत
nanded news
नांदेडात वाळूमाफियांच्या मुसक्या आवळल्याfile photo
Published on
Updated on

Sand Mafia Nabbed in Nanded

नांदेड : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीविरुद्ध प्राप्त तक्रारींची दखल घेत, पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई केली आहे. नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कल्हाळ शिवारात मंगळवारी (दि. २८) रात्री उशिरा टाकलेल्या छाप्यात इंजिन बोटी, हायवा आणि जेसीबीसह सुमारे ८७ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

nanded news
Nanded Crime : नांदेडात अवैध धंद्यांविरुद्ध डीआयजीचा प्रहार; जर्दा कारखाना उद्ध्वस्त

गोदावरी नदी पात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास या पथकाने कल्हाळ शिवारातील वाळू धक्क्यावर अचानक छापा टाकला. यावेळी नदी पात्रात इंजिन बोटीच्या साहाय्याने वाळू उपसा सुरू असल्याचे आणि फायबर बोटीतून ती वाळू किनाऱ्यावर आणली जात असल्याचे निदर्शनास आले.

चार आरोपींना बेड्या

या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता आणि महाराष्ट्र जमीन महसूल संहितेन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार भोकरे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

nanded news
Nanded illegal sand mining : पोलिसांची मोठी कारवाई; गोदावरी पात्रातील 25 लाखांचे साहित्य नष्ट

पोलीस उपनिरीक्षक पंकज इंगळे, प्रदीप खानसोळे, संजीव जिकलवाड, गणेश धुमाळ आणि कामाजी गवळी यांच्या पथकाने ही धाडसी कामगिरी बजावली. या कारवाईबद्दल पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप यांनी पथकाचे कौतुक केले आहे.

जप्त केलेला मुद्देमाल :

तीन इंजिन बोटी आणि एक फायबर बोट, वाळूने भरलेले ३४ तराफे, भारत बेंझ कंपनीचा हायवा आणि एक जेसीबी मशीन, नदीपात्राबाहेर काढून ठेवलेली ६० ब्रास वाळू,

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news