Nanded Monkey Attack | 3 पिसाळलेल्या वानरांचा धुमाकूळ: तिघांना चावा; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण

गडगा गावात नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर: तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी
Naigaon  Gadga Village Monkey Attack
Naigaon Gadga Village Monkey Attack Pudhari
Published on: 
Updated on: 

Naigaon Gadga Village Monkey Attack

नायगाव : गडगा गावात तीन वानरे पिसाळल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या वानरांनी गावातील तीन जणांना चावा घेतला. नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे ग्रामपंचायत, वन विभाग आणि संबंधित प्रशासनाने तातडीने लक्ष घालून या वानरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

गडगा गावातील तीन वानरे पिसाळल्याची माहिती समोर आली आहे. या वानरांनी गावातील महाजन पा. भाकरे, महेबूब साब देवकर यांच्या पत्नी आणि चंद्रकला भाकरे यांना चावा घेतल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गावातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतात आणि सार्वजनिक ठिकाणी जाणाऱ्या नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

Naigaon  Gadga Village Monkey Attack
Nanded post office agricultural store -डाकघर की कृषी सेवा केंद्र? फलक डाकघराचा, दुकानात कृषी साहित्य; नागरिकांमध्ये संभ्रम

नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

पिसाळलेल्या वानरांमुळे आणखी नागरिकांना इजा होण्याची शक्यता लक्षात घेता ग्रामस्थांनी सतर्क राहावे. वानरांच्या जवळ जाणे, त्यांना डिवचणे किंवा त्यांना पकडण्याचा स्वतःहून प्रयत्न करणे टाळावे. विशेषतः लहान मुलांनी घराबाहेर एकट्याने फिरू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेऊन ग्रामपंचायत प्रशासन, वन विभाग आणि संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी पाहणी करावी. पिसाळलेल्या वानरांना सुरक्षितरीत्या पकडून मानवी वस्तीतून दूर, योग्य ठिकाणी हलविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

Naigaon  Gadga Village Monkey Attack
Nanded Land Dispute : तळेगावच्या देशमुखांचे अपील अपर विभागीय आयुक्तांनी फेटाळले!

प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात

गावात तीन जणांना वानरांनी चावा घेतल्याची माहिती समोर आल्यानंतर संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रशासनाने विलंब न करता उपाययोजना करणे आवश्यक आहे. वन विभागाने प्रशिक्षित कर्मचाऱ्यांच्या मदतीने वानरांना सुरक्षितपणे पकडण्याची व्यवस्था करावी. तसेच संबंधित विभागांनी समन्वय साधून नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

वानराने चावा घेतलेल्या व्यक्तींनी तातडीने वैद्यकीय उपचार घ्यावेत. अशा प्राण्यांच्या संपर्कात आल्यास किंवा चावा घेतल्यास जखम साबण आणि वाहत्या पाण्याने सुमारे १५ मिनिटे धुऊन त्वरित रुग्णालयात जावे. रेबीज प्रतिबंधक उपचारांबाबत डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

गडगा गावातील नागरिकांनी घाबरून न जाता सावधगिरी बाळगावी आणि प्रशासनाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून पिसाळलेल्या वानरांचा बंदोबस्त करावा, असे आवाहन रामदास दिगांबर भाकरे गडगेकर यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news