

Mukhed python Caught
मुखेड : तालुक्यातील येवती बिट अंतर्गत हिब्बट येथील शेतकरी भिमराव नारायण मुंडे यांच्या शेतात अंदाजे १० फूट लांबीचा अजगर आढळून आला. ही घटना आज (दि. २३) सकाळी ९.३० वाजता घडली. शेतात अजगर दिसताच संभाजी गणपती कांगणे, अदिनाथ कांगणे आणि गावकऱ्यांच्या मदतीने अजगराला सुरक्षितपणे जेरबंद करण्यात आले.
यानंतर वनविभागाला माहिती देण्यात आली. वनपाल मारुती पानगटवार, येवती बिटच्या वनरक्षक स्वाती उत्तमराव मुंडे आणि अनिल अडगुलवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आणि अजगराला ताब्यात घेतले. पुढील कार्यवाहीसाठी अजगराला तालुका वनविभाग कार्यालयात नेण्यात आले असून, लवकरच त्याला जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.
अजगर अंदाजे ८ फूट लांब आणि सुमारे १० किलो वजनाचा आहे. मुखेड तालुक्यात पहिल्यांदाच इतका मोठा अजगर सापडल्याने परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्सुकतेने पाहण्यासाठी गर्दी केली होती.