Nanded Politics | एकसंघ नाईक परिवार दुभंगला: पुसद नगर परिषद निवडणुकीत जाऊबाई एकमेकींविरोधात मैदानात

Pusad Municipal Election | पुसद नगर पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवत असून भाजपने आपली वेगळी चूल मांडली आहे
NCP BJP  independent contest  Pusad election
पुसदचे नाईक कुटुंबीय वेगवेगळ्या पक्षाचा प्रचार करत आहेत (Pudhari Photo)
Published on
Updated on

NCP BJP independent contest Pusad election

उमरखेड : कधी काळी एकसंघ असलेला पुसद येथील नाईक परिवार आता दुभंगला आहे. एकाच परिवारातील सदस्य वेगवेगळ्या राजकीय पक्षात आहेत. माजी मंत्री मनोहरराव नाईक त्यांचे कनिष्ठ चिरंजीव राज्यमंत्री इंद्रनील नाईक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर थोरले पुत्र ययाती नाईक व पुतणे माजी आमदार अॅड. नीलय नाईक भाजपमध्ये आहेत.

पुसद नगर पालिकेची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर लढवत असून भाजपने आपली वेगळी चूल मांडली आहे. इंद्रनील नाईक यांच्या पत्नी मोहिनी नाईक या राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत आणि घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत. इकडे भाजपतर्फे निखिल चिद्दरवार अध्यक्षपदाच्या मैदानात आहेत. त्यांच्या विजयासाठी नाईक घराण्यातील दोन्ही जाऊबाई डॉ. सुजाता नीलय नाईक व उद्गम फाऊंडेशन पुसदच्या सचिव सोनल ययाती नाईक घरोघरी जाऊन प्रचार करीत आहेत.

NCP BJP  independent contest  Pusad election
Railway Mineral Scam | वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे गौण खनिज घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिका-यांना नोटीस

आता मोहिनी नाईक यांची निवडणूक निशाणी 'घड्याळ' आहे. तर त्यांच्या या जाऊबाई मात्र कमळाचा प्रचार करताना दिसत आहेत. नाईक परिवारातील असे चित्र आजपर्यंत दिसले नाही. आता मोहिनी नाईक विजयी होतात की, त्यांच्या जावा विजयोत्सव साजरा करतात. याकडे ३ डिसेंबररोजी जाहीर होणाऱ्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news