

नायगाव, पुढारी वृत्तसेवा : मी चौकशीच्या भीतीने पक्ष बदलला नाही. तर वरिष्ठांच्या आदेशाने पक्ष बदलला. परंतु, मी अनेक पक्ष बदलले, तरी माझे सर्वांसोबत जिव्हाळ्याचे ऋणानुबंध पूर्वी पासूनच असल्यामुळे मी निवडून आलो. मी कसा पराभूत होईल, असे विरोधकांना वाटत होते. पण मी सतत निवडून येत राहिलो, हा आनंद माझ्यासह माझ्या स्नेहीचा आहे, असे प्रतिपादन आमदार प्रतापराव पाटील- चिखलीकर (Pratap Patil Chikhalikar) यांनी केला.
शिवराज पाटील - होटाळकर यांनी हेडगेवार चौकात आयोजित केलेल्या राष्ट्रवादी पक्ष (अजित पवार गट) प्रवेश सोहळा व सभासद नोंदणी अभियान कार्यक्रमात अशोकराव चव्हाण यांचे नाव न घेता चिखलीकर यांनी निशाणा साधला.
यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी बरबडेकर, प्रदेश सरचिटणीस विक्रम देशमुख, वसंत सुगावे, उत्तमराव सोनकांबळे, संभाजीराव मुकनर, अॅड. बाळासाहेब कांबळे, रणजीत पाटील हिवराळे, दिलीप चोळाखेकर, तालुका अध्यक्ष धर्माबाद अंकुश हनुमंते, यादवराव तुडमे, ज्ञानेश्वर कदम, तालुकाध्यक्ष नायगाव, ज्ञानेश्वर सुर्यवाड, विशाल पाटील- शिंदे, सचिन पाटील बेंद्रीकर, आनंद पाटील- पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. व्यंकटराव पाटील- शिंदे यांनी सूत्र संचालन केले. श्रीपती शिंदे यांनी आभार मानले.
काँग्रेस जिल्हा महिला आघाडीच्या सरचिटणीस रेखा शेळगावकर यांच्य़ासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. तर भाजप मंडळ प्रमुख साहेबराव देगावकर, उपसरपंच कैलास जाधव, आत्माराम जाधव, मारोती मोरे, गोविंद डाकोरे, आनंदराव शिंदे, मंगेश बेंद्रीकर, रावसाहेब बेलकर, उमाकांत कुरे, शिवराज जाधव, निळकंठ जाधव, मारोती भाकरे आदी भाजप,काँग्रेससह कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.