Nanded |शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत मिळणार'; आरोग्यमंत्र्यांकडून हिमायतनगर तालुक्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी!

Prakash Abitkar Himayatnagar drought visit- शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत मिळणार; सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरPudhari
Published on: 
Updated on: 
Summary

दरेगाव तांडा, वाळकेवाडीला भेट; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन, आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर मंत्र्यांची नाराजी

हिमायतनगर : राज्यातील सार्वजनिक आरोग्य सेवा अधिक प्रभावी, सुलभ आणि गुणवत्तापूर्ण करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने राज्यव्यापी ‘जन आरोग्य संवाद यात्रे’चा प्रारंभ करण्यात आला. या यात्रेच्या पहिल्याच दिवशी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी हिमायतनगर तालुक्याचा दौरा करून दुष्काळग्रस्त दरेगाव तांडा आणि वाळकेवाडी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकरी व नागरिकांशी थेट संवाद साधला. तसेच जीवन संपवलेल्या शेतकरी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना मदतीचे आश्वासन दिले.

हिमायतनगर तालुक्यात पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस व इतर पिके करपून गेली आहेत. या गंभीर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आरोग्यमंत्री आबिटकर यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांच्या नुकसानीची माहिती घेतली. संकटाच्या काळात शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये, राज्य सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून सरकारकडून टप्प्याटप्प्याने मदत उपलब्ध करून दिली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

दौऱ्याची सुरुवात दरेगाव तांडा येथून झाली. येथे त्यांनी पाण्याअभावी सुकत असलेल्या पिकांची पाहणी केली. तसेच दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. यावेळी परिसरातील आरोग्य सुविधांचा आढावा घेत रुग्णांना वेळेत उपचार मिळतात का, आरोग्य कर्मचारी नियमितपणे गावांना भेटी देतात का, याची माहिती घेतली. आरोग्य सेवेत हलगर्जीपणा होत असल्याच्या तक्रारींवरून संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारत सेवा सुधारण्याच्या सूचना केल्या.

यानंतर वाळकेवाडी येथे भेट देऊन त्यांनी शेतकरी कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. संबंधित कुटुंबीयांना आवश्यक ती मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासनही दिले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर आणि आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या हस्ते गावातील नागरिकांना आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले.

यावेळी उपस्थित आदिवासी बांधव आणि शेतकऱ्यांनी आपल्या समस्या मांडल्या. दुधड येथील आरोग्य उपकेंद्र सतत बंद राहत असल्याची गंभीर तक्रार नागरिकांनी केली. याची दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी आरोग्य यंत्रणेच्या कामकाजाबाबत नाराजी व्यक्त केली. त्यानंतर हिमायतनगर येथील उपजिल्हा रुग्णालयाला भेट देऊन त्यांनी विविध विभागांची पाहणी केली. रुग्णालयात औषधांचा वारंवार तुटवडा, अपुऱ्या वैद्यकीय सुविधा आणि रुग्णांना वेळेत उपचार मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. यावर उपस्थित आयुक्त आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना रुग्णालयातील त्रुटी तातडीने दूर करून आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
Nanded News : सगरोळीत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम करताना तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा आणि ग्रामीण आरोग्य व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्याचा निर्धार, अशा दुहेरी भूमिकेतून आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचा हिमायतनगर तालुक्यातील दौरा पार पडला. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून संकटग्रस्त शेतकऱ्यांना टप्प्याटप्प्याने मदत मिळेल, या आश्वासनामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी आयुक्त संजय काटकर, आरोग्य विभाग सहसंचालक डॉ. विजय कंदेवाड, लातुर विभाग उपसंचालक डॉ. सांळुखे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसीलदार पल्लवी टेमकर व हिमायतनगर महसूल,आरोग्य विभागाचे अधिकारी, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक उपस्थित होते.

आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर
Eknath Shinde : दुष्काळाच्या छाताडावर पाय रोवून पुढे जाण्याची गरज

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.