Nanded Accident : वाळूच्या भरधाव हायवाने पादचाऱ्यास चिरडले

पादचारी जागीच ठार ः सगरोळी गावातील घटना
Nanded Accident
वाळूच्या भरधाव हायवाने पादचाऱ्यास चिरडलेpudhari photo
Published on
Updated on

बिलोली ः वाळूची वाहतूक करणाऱ्या एका भरधाव हायवाने पादचाऱ्याला चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी 10 च्या सुमारास सगरोळी येथील अनुसया नगरात घडली. विठ्ठल गोविंद लवटे असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

16 मे रोजी सकाळी 10 च्या दरम्यान हायवा (एमएच 20 जीसी 0793) वाळू घेऊन देगलूरकडे जात होता. अनुसयानगर परिसरातील विठ्ठल लवटे हे रस्त्यावरून जात असताना त्याना सदरील हायवाने धडक देऊन चिरडले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला.

Nanded Accident
Tiger Attack Chandrapur | मोहफुल वेचण्यासाठी गेलेली महिला वाघाच्या हल्ल्यात ठार

या घटनेची माहिती मिळताच बिलोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब रोकडे यांनी घटनास्थळी धाव घेवून घटनेचा पंचनामा केला. एकंदरीत पहाता दिवसरात्र रेतीची वाहतूक चालू आहे. वाहचालक हे सुसाट वेगाने वाहन चालवत असून यामध्ये विना नंबर प्लेटच्या वाहनांचा भरणा जास्त आहे.

Nanded Accident
Chandrapur Tiger News | चंद्रपूर–मुल मार्गावर वाघाचा थरार; शिकार केलेला बैल फरपटत नेताना महामार्ग काही काळ ठप्प

परिणामी अपघाताचे प्रमाण वाढत आहेत. यामुळे नाहक नागरिकांचा बळी जात आहे. त्यामुळे महसूल प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देेवून फिरते पथक नेमावे व वाळूच्या वाहतुकीचे नियम तोडणाऱ्या वाहनांवर व चालकांवर कारवाई करावी, अशी मागणी सगरोळीतील नागरिकांनी केली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news