Illegal Liquor Seized : दारू साठ्यासह 9.51 लाखांच्या मुद्देमाल जप्त

तिघे गजाआड ः ग्रामीण पोलिस ठाण्याच्या पथकाची फिल्मीस्टाईल कारवाई
illegal liquor
Liquor Pudhari
Published on
Updated on

नांदेड ः जिल्ह्यात अवैध धंद्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन क्रॅक डाऊन अंतर्गत नांदेड ग्रामीण पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत विदेशी दारूची अवैध वाहतूक करणारी टोळी गजाआड केली आहे. मामा चौक भागात पोलिसांनी फिल्मी स्टाईलने टाकलेल्या छाप्यात एका कारसह तब्बल 9 लाख 51 हजार 755 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, तीन आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले आहेत. पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 13 मे रोजी रात्री नांदेड ग्रामीण पोलिसांना एका कारमधून विदेशी दारूची मोठी खेप जात असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाली.

illegal liquor
Nanded crime : नांदेड परिक्षेत्रात 9 दिवसांत 66 लाखांचा मुद्देमाल हस्तगत

माहिती मिळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने रात्री 11:20 वाजण्याच्या सुमारास शहरातील मामा चौक परिसरात दबा धरून सापळा रचला. संशयास्पद कार येताच पोलिसांनी तिला वेढा घालून थांबवले. कारची झडती घेतली असता, त्यात पोलिसांना अवैध विक्रीसाठी नेला जाणारा विदेशी दारूचा साठा मिळून आला.

illegal liquor
Nanded Crime : व्हायरल व्हिडिओचा पोलिसांना फायदा; आंतरजिल्हा टोळी जेरबंद

पोलिसांनी घटनास्थळावरून विदेशी दारूच्या बाटल्या आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण 9,51,755 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी अमोल माधव हाळे (वय 45, रा. मनूर, ता. उमरी, जि. नांदेड), नंदू विक्रम घोगरे (वय 40, रा. वाघाळा, ता. जि. नांदेड), कालीदास व्यंकट वरळे (वय 30, रा. पळसी, ता. लोहा, जि. नांदेड) या तिघांविरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 549/2026 नुसार, महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम 65 (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news