दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

बिटरगाव पोलिसांची कारवाई
Suspects arrested
दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले अट्टल चोरटे पोलिसांच्या जाळ्यातfile photo
Published on
Updated on

उमरखेड : दरोडा घालण्याच्या उद्देशाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास तालुक्यातील शिंदगी शिवारातील शेतात पाच जण दबा धरून बसलेले होते. याबाबतची माहिती मिळताच बिटरगाव पोलिसांनी तत्परता दाखवत घटनास्थळी धाव घेत, ग्रामस्थांच्या मदतीने चौघांना ताब्यात घेतले. तर एकाने अंधाराचा फायदा घेत पळ काढला. चोरट्यांकडुन पोलीसांनी धारदार चाकू, पेंचिस, लोखंडी रॉड, दुचाकी आदी मुद्देमाल जप्त करण्यात आला. लक्ष्मण टोकलवाड (वय २६) वर्ष, मिलिंद राऊत (वय ३२) वर्ष, दिनेश डांगे (वय २४) वर्ष, सतीश टोकलवाड (वय ३०) वर्ष, (सर्व रा. डोल्हारी,ता, हदगाव जिल्हा नांदेड )अशी ताब्यात घेण्यात आलेल्या चौघांची नावे असून गणेश बट्टेवाड (वय २४) वर्ष असे फरार आरोपीचे नाव आहे.

Suspects arrested
महामार्गावर लुटमार करणारे आंतरराज्यीय चोरटे जेरबंद

या प्रकरणी पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उमरखेड तालुक्यातील शिंदगी शिवारातील शेतात पाच जण शुक्रवारी मध्यरात्री दरोडा टाकण्याच्या उद्देशाने दबा धरून होते. याबाबतची माहिती पोलिस पाटील पांडुरंग वांगे यांनी बिटरगाव पोलिसांना दिली. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता ठाणेदार संतोष मनवर, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, पोलिस कर्मचारी रवी गिते, निलेश भालेराव, देविदास हाके, बालाजी मस्के, चंद्रमणी वाढवे आदींनी शासकीय वाहनाने सिंदगी गाठले. यावेळी सर्व चोरटे जनार्धन नल्लेवाड यांच्या शेताजवळ असलेल्या सिंगल फेज डीपीजवळ अंधाराचा फायदा घेऊन दबा धरून बसलेले दिसले. दरम्यान पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेतले असून अंधाराचा फायदा घेत एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार संतोष मनवर, पोलिस उपनिरीक्षक शिवाजी टिपूर्णे, रवी गिते, देविदास हाके, निलेश भालेराव आदींनी पार पाडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news