Youth Death Nanded | वझरा येथील धबधब्याच्या डोहात बुडून तरुणाचा मृत्यू

किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील तरुण डोहातून पाणी आणण्यासाठी गेला होता
Wazra waterfall accident
Wazra waterfall accidentPudhari
Published on
Updated on

Wazra waterfall accident

श्रीक्षेत्र माहूर : तालुक्यातील पर्यटन केंद्र म्हणून सुपरिचित असलेल्या धबधब्याच्या डोहातील पाण्यात बुडून किनवट तालुक्यातील गोकुंदा येथील शेख इर्शाद शेख शफी या 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (दि. 3) घडली.

मृत इर्शाद हा शेख फरीद वझरा येथील धबधब्याच्या डोहातून पाणी आणण्यासाठी गेल्याचे सांगण्यात येते. धबधब्याच्या डोहात सध्या दोन किंवा तीन फुट पाणी असल्याचे समजते, एवढ्या कमी पाण्यात बुडून इर्शादचा मृत्यू झालाच कसा, अशी सर्वत्र कुजबुज सुरु आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news