Nanded news | उमरीत दोन गटात राडा, तणावपूर्ण शांतता

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला
Satara Youth Clash
तणावPudhari Photo
Published on
Updated on

उमरी : गेल्या चार-पाच दिवसापासून नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणूकीत मतदान करण्याच्या दृष्टिकोनातून सेवा सहकारी सोसायटीच्या सदस्यांपैकी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गावोगावी ठराव घेण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. उमरी सेवा सहकारी सोसायटी सदस्यांचा ठराव घेण्याची प्रक्रिया उमरी शहरात 4 एप्रिल रोज शनिवारी सुरू झाली होती. दरम्यान दोन गटात राडा झाल्याने शहरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून पुढील अनर्थ टाळला.

सध्या उमरी शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून दुपारपर्यंत तरी तक्रार दाखल केली नसल्याचे पोलीस निरीक्षक जयप्रकाश गुट्टे यांनी सांगितले आहे. सेवा सहकारी सोसायटीत ठराव घेण्याच्या दृष्टिकोनातून शनिवारी सकाळी उमरीत सेवा सहकारी सोसायटी सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान एक सदस्य गैरहजर होता. त्यामुळे ठराव पारित झाला नाही. मात्र किरकोळ कारणावरून गोरठेकर गट आणि कवळे गुरुजी गटात बाचाबाची झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला होता.

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे प्रकरण शांत झाले. मात्र दुपारपर्यंत या संदर्भात पोलिसात कुणीही तक्रार दाखल केली नव्हती. जिल्हा बँक निवडणुकीसाठी गोरठेकर आणि कवळे गुरुजी यांच्यात सत्तास्पर्धा सुरू झाली असून जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी दोन्ही गटाकडून जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news