Heliplant Project : 'हेलिप्लांट' उभारणीचे पुढचे पाऊल अद्याप ठप्प !

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील प्रकल्पासाठी जागा उपलब्ध असली, तरी अद्याप कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात आले.
'हेलिप्लांट' उभारणीचे पुढचे पाऊल अद्याप ठप्प !
'हेलिप्लांट' उभारणीचे पुढचे पाऊल अद्याप ठप्प !file photo
Published on
Updated on

Nanded The next step in setting up the 'Heliplant' remains stalled

नांदेड, पुढारी वृत्तसेवा : नांदेड जिल्ह्यात सव्वाचार हजार कोटींची गुंतवणूक असलेला हेलिप्लांट प्रकल्प उभारण्याबाबत सामंजस्य करार झाल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी मार्च महिन्यात केली होती. त्यास पाच महिने लोटले, तरी प्रकल्प उभारणीच्या दिशेने पुढचे पाऊल अद्याप पडलेले नाही. महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या स्थानिक अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार वरील प्रकल्पासाठी जागा उपलब्ध असली, तरी अद्याप कोणीही संपर्क साधला नसल्याचे सांगण्यात आले.

'हेलिप्लांट' उभारणीचे पुढचे पाऊल अद्याप ठप्प !
Nanded crops revived : दमदार पावसाच्या हजेरीमुळे पिकांना मिळाले जिवदान; बळीराजा सुखावला

राज्य विधिमंडळाच्या गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी वरील प्रकल्प आणि कराराची घोषणा केल्यानंतर महापालिका निवडणुकीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी नांदेडमध्ये दिलेल्या आश्वासनाची पूर्ती झाल्याची भावना भाजपा नेते खा. अशोक चव्हाण यांनी तेव्हा व्यक्त केली होती. त्यानंतर राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत हे नांदेडमध्ये आले असता हेलिप्लांट प्रकल्पाबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असे संभ्रमात टाकणारे वक्तव्य त्यांनी केल्यानंतर भाजपाच्या स्थानिक यंत्रणेकडून त्यावर स्पष्टीकरणही देण्यात आले.

उद्योगमंत्र्यांच्या वादग्रस्त विधानानंतर वरील प्रकल्पासंदर्भात गेल्या मार्च महिन्यात विधान भवनामध्ये झालेल्या सामंजस्य कराराचे छायाचित्रही समोर आले. राज्य शासन आणि रेटाव्हिया प्रा.लि. या कंपनीदरम्यान झालेल्या सामंजस्य करारानुसार ही कंपनी नांदेड जिल्ह्यात हेलिकॉप्टर निर्मिती, जुळवणी व सुट्या भागांचे उत्पादन करणारा प्रकल्प उभारणार असल्याचे जाहीर झाले होते. त्यातून सुमारे २ हजार नोकऱ्या उपलब्ध होतील, अशी माहिती खा. चव्हाण यांनी तेव्हा दिली होती; पण पाच महिने लोटले तरी, नियोजित प्रकल्पासंबंधी कुठलीही हालचाल अद्याप झालेली नसल्याचे दिसून आले.

'हेलिप्लांट' उभारणीचे पुढचे पाऊल अद्याप ठप्प !
Nanded rain news: सलग 3 दिवसांच्या मुसळधार पावसाने जनजीवनही झाले विस्कळीत

महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या नांदेड कार्यालयामध्ये विचारणा केली असता नायगाव तालुक्यातील कृष्णुर येथील पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमध्ये मोठ्या प्रकल्पासाठी पुरेशी जागा उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले; पण मुख्यमंत्र्यांनी वरील प्रकल्पाची घोषणा केल्यानंतर संबंधित कंपनीतर्फे काही अधिकाऱ्यांनी एकदा केलेली स्थळपाहणी सोडल्यास पुढे कुठलीही हालचाल झालेली नसल्याचे दिसून आले.

नायगाव मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी नियोजित प्रकल्प आपल्या मतदारसंघातील औद्योगिक वसाहतीत व्हावा, अशी मागणी करून संबंधितांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले होते. संबंधित कंपनीच्या अधिकाऱ्यांनी कृष्णुर औद्योगिक वसाहतीत उपलब्ध जागेची प्रत्यक्ष पाहणी केली तेव्हा पवार यांच्या वतीने त्यांच्या सहचारिणी पूनम पवार यांनी सर्वांचे आदरातिथ्य केले होते; पण आता या नियोजित प्रकल्पासंबंधी संभ्रम निर्माण झाला आहे.

वरील कंपनीला शासनाच्या वतीने संपूर्ण सहकार्य केले जाईल. इतर राज्यांच्या तुलनेत जास्तीत जास्त सुविधा देण्यात येतील, असे उद्योग खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कंपनीच्या प्रतिनिधींना सांगितले होते. हा प्रकल्प उभारण्याच्या प्रस्तावाचे पुढे काय झाले याची माहिती घ्यावी लागेल, असे आ. राजेश पवार यांनी बुधवारी सांगितले. खा. अशोक चव्हाण यांनी मात्र अलीकडच्या काळात या प्रकल्पाबाबत चकार शब्द काढला नाही. पण त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news