Nanded news: टाकळी (बु) गावात भूगर्भातून 4 वेळा आवाज; प्रशासन सतर्क, नागरिकांना सावधतेचे आवाहन

underground sounds latest news: पुन्हा अशी घटना घडल्यास भीती न बाळगता सतर्क राहण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्या आहेत
Nanded news
Nanded news
Published on
Updated on

नायगाव: तालुक्यातील टाकळी (बु) या गावात रविवारच्या दिवशी भूगर्भातून येणारा गूढ आवाज अन् जाणवलेल्या धक्क्यांमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. रविवारी (दि. 12) सकाळी 11 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत एकूण चार वेळा मोठे आवाज झाले आणि जमीन हादरल्याची घटना घडली. यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले.

या घटनेनंतर प्रशासन सतर्क

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने तातडीने जिल्हा प्रशासनाला कळवले. प्रशासनाने राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या संकेतस्थळावर (National Centre for Seismology) तपासणी केली, मात्र या भूगर्भीय हालचालींची कोणतीही नोंद आढळली नाही. या घटनेचा सखोल अभ्यास करण्यासाठी आणि आवाजाचे नेमके कारण शोधण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या 'अर्थ सायन्स' विभागातील प्राध्यापक डॉ. टी. विजयकुमार यांना माहिती घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना आवाहन

तहसीलदारांनी दिलेल्या माहितीनुसार या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.

  • घाबरून न जाता सतर्क राहावे.

  • घरांवरील पत्रांच्या छतावरील दगड तातडीने काढून टाकावेत आणि पत्रे बोल्टने घट्ट बसवावीत.

  • पुन्हा आवाज आल्यास त्वरित घराबाहेर मोकळ्या जागेत जमावे.

  • कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये.

  • तातडीच्या मदतीसाठी (02462) 235077 या जिल्हा आपत्कालीन कार्यकेंद्राच्या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news