Nanded stray dog attack | हिमायतनगर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ बालकांना घेतला चावा... लहान बालकांचा जीव धोक्यात!

दोन दिवसांत वीस जणांना घेतला चावा उपजिल्हा रूग्णालयात इंजेक्शनसाठी रांग...
Nanded Stary Dog
Nanded Stary Dog | हिमायतनगर शहरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ बालकांना घेतला चावा... लहान बालकांचा जीव धोक्यात!
Published on
Updated on

हिमायतनगर: शहरासह ग्रामीण भागात पिसाळलेल्या कुत्र्यानी हैदोस घातला असुन अनेक खर्जीले कुत्रे झाली असून लहान बालकांसह वृद्धांचा पाठलाग करीत चावा घेत असल्याच्या घटना घडत आहेत. गुरूवारी हिमायतनगर शहरात एका बालकाला भयानक चावा घेतला असल्याने गंभीर दुखापत झाली असुन दिवसभरात आठ जणांना चावा घेतला तर दोन दिवसांत जवळपास वीस जनांना कुत्र्यांनी चावा घेतला असल्याची नोंद उपजिल्हा रुग्णालयात झाली असुन नांदेड रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

हिमायतनगर शहरात एकूण विस जणांना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला असल्याची नोंद हिमायतनगर च्या उपजिल्हा रुग्णालयात झाली आहे. शहरात गल्लोगल्ली पिसाळलेल्या कुत्र्यांनी दहशत निर्माण केली असून या कुत्र्यांमुळे लहान बालकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.ग्रामीण भागात देखील कुत्र्याने अनेकांना चावा घेतला असल्याची माहिती रूग्णालयातील डॉक्टरांनी दिली आहे.

दररोज जवळपास दहा रूग्ण कुत्र्याने चावा घेतलेले ऐत असल्याची माहिती आहे.असे अनेक रुग्ण येत असल्यामुळे रेबीज लस चा तुटवडा निर्माण झाला असल्याचे सांगितले आहे. या पिसाळलेल्या कुत्र्यांचा नगरपंचायत ने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी होत असुन अद्यापही नगरपंचायतने या बाबतीत पावले उचलली नसल्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्यांपासुन बालकांसह नागरीकांना घराबाहेर फिरण्यासाठी धोकादायक ठरत असुन भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गुरुवारी शहरातील नेहरूनगरमध्ये राहणाऱ्या पुर्वा अमोल चव्हाण या मुलीस पिसाळलेल्या कुत्र्याने गालवर,हातावर जब्बर चावा घेतला आहे सदरील मुलीस शहरातील उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले होते उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.घटनेची माहिती मिळताच नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी तातडीने रूग्णालयात भेट देऊन सदरील रूग्णांच्या तब्येतीची विचारपूस केली डॉक्टरांशी चर्चा केली.शहराती पिसाळलेल्या कुत्र्यांचा बंदोबस्त नगरपंचायत लवकरच करणार असुन नागरीकांनी आपल्या लहान बालकांना बाहेर फिरताना काळजी घ्यावी असे आवाहन नगराध्यक्ष शेख रफिकभाई यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news