Nanded Crime : नांदेडमध्ये भंगार वेचणाऱ्याचा पेव्हर ब्लॉकने मारून खून; एकास अटक, दोघे फरार

दारूच्या नशेत झालेल्या जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर
Nanded Crime
मंगल शंकर गवळी pudhari photo
Published on
Updated on

नांदेड : संगम कार बाजार परिसरात दारूच्या नशेत झालेल्या जुन्या वादातून भंगार वेचणाऱ्या व्यक्तीचा डोक्यात पेव्हर ब्लॉक मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना ७ ऑगस्ट रोजी घडली. या प्रकरणात इतवारा पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून, त्याचे दोन साथीदार अद्याप फरार आहेत.

मंगल शंकर गवळी (रा. लोंढे सांगवी, ता. लोहा, जि. नांदेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ७ ऑगस्टच्या रात्री संगम कार बाजार येथील एका दुकानाबाहेर तीन जणांनी मंगल गवळी यांच्याशी भंगार वेचण्याच्या कारणावरून वाद घातला. वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन आरोपींनी त्यांच्या डोक्यात पेव्हर ब्लॉक घातला. या गंभीर हल्ल्यात मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला.

Nanded Crime
Nanded Crime : इंदरजितसिंघ बावरी खून प्रकरणाचा उलगडा; पाच आरोपी अटकेत

​पोलीस हवालदार किशन सोनकांबळे यांच्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांनी स्थानिक गुन्हे शाखा व इतवारा पोलिसांना तपासाचे आदेश दिले. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी मंगल गवळी यांची ओळख पटवली.

तपासाची चक्रे वेगाने फिरवत पोलिसांनी सुजल उर्फ सूजित सुनिल पोटभरे (वय २१, रा. श्रावस्तीनगर, नांदेड) यास ताब्यात घेतले आहे. प्राथमिक तपासात दारूच्या नशेत जुन्या वादातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. फरार दोन आरोपींचा शोध व पुढील तपास इतवारा पोलीस करत आहेत.

Nanded Crime
Dharashiv water conservation : धरणातील गाळ शेतात; १३ हजार हेक्टर जमीन सुपीक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news