Nanded Crime | नांदेड ग्रामीण पोलिसांचा अवैध धंद्यांवर धडक कारवाई ; १७ आरोपींवर पाच गुन्हे, १.९७ लाखांचा मुद्देमाल जप्त

नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुटखा विक्री आणि तिरट जुगाराविरोधात धडक कारवाई करत १७ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल
Illegal Businesses Crackdown Nanded
नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुटखा विक्री आणि तिरट जुगाराविरोधात धडक कारवाई करत १७ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखलPudhari
Published on
Updated on

Illegal Businesses Crackdown Nanded

नवीन नांदेड : जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेत नांदेड ग्रामीण पोलिसांनी गुटखा विक्री आणि तिरट जुगाराविरोधात धडक कारवाई करत १७ आरोपींविरुद्ध पाच गुन्हे दाखल केले. या कारवाईत एकूण १ लाख ९७ हजार १८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या पथकाने ३० जून रोजी गुप्त माहितीच्या आधारे आहिल्याबाई चौक परिसरातील ठाकूर पान शॉपवर छापा टाकला. यावेळी शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा व पानमसाल्याचा साठा आढळून आला. याप्रकरणी विक्रमसिंह बद्रिसिंह ठाकूर (रा. कौठा, नांदेड) याच्याविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करून प्रतिबंधित साहित्य जप्त करण्यात आले.

Illegal Businesses Crackdown Nanded
Nanded crime : बापाची आयुष्यभराची पुंजी अन् मुलाची 'गद्दारी'; मैत्रिणीच्या संगनमताने केली लाखोची चोरी!

यानंतर पोलिसांनी लातूर फाटा, सिडको रोड, जुना कौठा रोड आणि उस्माननगर रोड परिसरात एकाच वेळी छापेमारी करून तिरट जुगार खेळणाऱ्या १६ जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार स्वतंत्र चार गुन्हे दाखल केले. या कारवाईत रोख रक्कम तसेच जुगारासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर व त्यांच्या पथकाने केली.

Illegal Businesses Crackdown Nanded
Nanded Crime : खंजीरसह चौघांना अटक; पोलिसांची कारवाई

जिल्ह्यात अवैध वाळू उत्खनन, अवैध मद्यविक्री, गुटखा विक्री, जुगार तसेच इतर बेकायदेशीर व्यवसायांविरोधातील कारवाया आगामी काळात आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा नांदेड ग्रामीण पोलिसांनी दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news