

लोहा : लोहा तहसील कार्यालयातील सभागृहात दुपारी तीन वाजता जिल्हा पुनर्वसन अधिकारी संजीव मोरे यांच्या उपस्थितीत तहसीलदार विठ्ठल परळीकर, गट विकास अधिकारी महेंद्र कुलकर्णी, नायब तहसीलदार अशोक मोकले यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांच्या उपस्थिती एका लहान मुलांच्या हस्ते चिट्ठी काढून पंचायत समिती गणाचे आरक्षण सोडत काढण्यात आले, तालुक्यातील बारा गणासाठी सोडत काढण्यात आलेले आरक्षण पुढीलप्रमाणे आहे.
लोहा पंचायत समिती गण आरक्षण जाहीर
१) माळेगाव यात्रा sc महिला
२) माळाकोळी गण ओबीसी महिला,
३) सोनखेड गण सर्वसाधारण,
४) शेवडी बा गण ओबीसी,
५) पेनुर गण ओबीसी महिला,
६) सावरगाव सर्वसाधारण महिला,
७) कलंबर गण सर्वसाधारण महिला,
८) हाडोळी गण सर्वसाधारण,
९) वडेपुरी गण सर्वसाधारण महिला,
१०) किवळा गण सर्वसाधारण ,
११) उमरा गण सर्वसाधारण,
१२) मारतळा गण sc महिला,
अशाप्रकारे पंचायत समिती गणाची सोडत जाहीर करण्यात आली असून सभापतीपद हे ओबीसी महिला करिता जाहीर झाले आहे यावेळी ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.