Nanded Politics : युती झाली तर ठीक, अन्यथा स्वबळावर भगवा फडकविणार

बाबूराव कदम : शिवसेनेच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन
नांदेड
मुदखेड : संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनानंतर आ. बाबुराव कदम यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी ससंवाद साधला.Pudhari News Network
Published on
Updated on

मुदखेड (नांदेड) : मुदखेड नगरपरिषद निवडणूक जाहीर झालेली असून भारतीय जनता पक्षासोबत युती करण्यास एक पाऊल पुढे आहोत. युती झाली तर ठीक, अन्यथा शिवसेना शिंदे गट स्वबळावर निवडणूक लढवून मुदखेड नगरपरिषद व भगवा फडकविणार असल्याचा विश्वास आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

2 डिसेंबर रोजी मुदखेड नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. सर्वच पक्षांनी आपापल्या परीने मतदारांची जुळवा जुळव सुरू केलेली आहे. शिवसेना शिंदे गट महायुतीत घटक पक्ष आहे. यासाठी होणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीत आम्ही भारतीय जनता पक्ष सोबत युती करण्यास एक पाऊल पुढे येत तयारीत आहोत, पण भाजपकडून युती संदर्भात निर्णय न घेतल्यास शिवसेना शिंदे गट मुदखेड नगर परिषदेचे २० वार्ड व एक नगराध्यक्षपदासाठी उमेदवार उभे करणार असून नगरपरिषदेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही अशी ग्वाही दिली.

नांदेड
Nanded News ... तर राज्यभरातील मराठे परळीच्या दिशेने कूच करतील

यावेळी हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरातील शासनाचे काम कशाप्रकारे सुरू आहे, याचीही माहिती उपस्थित कार्यकर्त्यांना दिली. जिल्हा प्रमुख विनय गिरडे पाटील यांनीही कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. महिला जिल्हाध्यक्षा गीताताई पुरोहित, येथील शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख सचिन माने, संजय पाटील कुरे, बाजार समिती माजी संचालक सुरेश शेटे आदींनी मुदखेड शहरातील आजची राजकीय परिस्थितीची माहिती सांगितली. शिवसेना पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन सर्वप्रथम झाल्याने सध्यातरी शिवसेना शिंदे गट सर्वच राजकीय पक्षांच्या पुढे दिसत आहे. उद्घाटनप्रसंगी शहर व ग्रामीण भागातील अनेक तरुणांनी शिवसेनेत प्रवेश घेऊन हाती भगवा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news