Nanded Political News : मुखेड नगर परिषदेत 'राष्ट्रवादी' चे घड्याळ बंद !

एकही उमेदवार मिळाला नाही : दहा ठिकाणी पक्ष स्वबळावर
Nanded Political News
Nanded Political News : मुखेड नगर परिषदेत 'राष्ट्रवादी' चे घड्याळ बंद !File Photo
Published on
Updated on

Nanded Political News:Mukhed Municipal Council

विशेष प्रतिनिधी

नांदेड : मागील वर्षभरात मोठा गाजावाजा करत जिल्ह्यात पक्षविस्तार करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोहा आणि कंधार नगर परिषदेत मोठा जोर लावलेला असताना शेजारच्या मुखेड नगरपरिषदेमध्ये मात्र या पक्षाचे पडघाळ बंद पडले. नगराध्यक्ष तसेच नगरसेवकपदासाठी या पक्षाला एकही उमेदवार मिळाला नाही. मुखेडचे दोन माजी आमदार या पक्षामध्ये सक्रिय आहेत; पण त्यांतील एकाच्या पुतण्याने भाजपाची उमेदवारी घेतली आहे.

Nanded Political News
Railway Mineral Scam | वर्धा- यवतमाळ- नांदेड रेल्वे गौण खनिज घोटाळ्याप्रकरणी जिल्हाधिका-यांना नोटीस

काँग्रेसचे अविनाश घाटे तसेच शिवसेनेचे सुभाष साबणे हे दोन माजी आमदार, काँग्रेसच्याच माजी जि.प. अध्यक्ष वैशाली चव्हाण त्यांचे पती स्वप्नील व श्वशुर शेषराव चव्हाण तसेच जि.प.चे माजी सभापती व्यंकटराव गोजेगावकर है नेते आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कार्यरत आहेत, चव्हाण परिवार तसेच साबणे यांच्या प्रवेशासाठी पक्षाध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित पवार हे मागील काळात मुखेड पुजारी क देगलुरला उसले विशेष होते; पण मुखेडच्या नेत्यांना नगरपालिका निवडणुकीसाठी बमेदवारांची जमवाजमव करता आली नाही. त्यामुळे या सवाँचे स्थानिक नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर, पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवराज होटाळकर यांची नाचकी झाली असून चिखलीकरांचे अनेक दावे फोल ठरले आहेत.

मुखेड मतदारसंघात भाजपाचे नेतृत्व आ.डॉ. तुषार राठोड यांच्याकडे आहे. त्यांनी नगराध्यक्ष तसेच नगरसेवक पदासाठी उमेदवारांची निवड करून प्रभागनिहाय नियोजनबद्ध प्रचार सुरू केला तर दुसरीकडे राष्ट्रवादीने मुखेडची जबाबदारी सुभाष साबणे यांच्यावर टाकली होती; पण अर्ज दाखल करण्याची मुदत संपेपर्यंत या पक्षातर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यास एकही इच्छुक समोर आला नाही, नगरसेवकपदासाठी या पक्षाकडून केवळ एकाने पक्षाचा 'बी फॉर्म' नेला, अशी माहिती समोर आली आहे.

Nanded Political News
Illegal Murum Excavation | हायवा सुखरूप, जेसीबी अडकली, माफियांच्या बचावात प्रशासन सामील

माजी आमदार अविनाश घाटे हे मागील अनेक वर्षांपासून नांदेड-मुखेड अशी ये-जा करत राजकारण करतात. नगरपालिका निवडणुकीसंदर्भातील चर्चा त्यांच्या मुखेड येथील घरामध्येव झाल्या. निवडणूक प्रक्रियेदरम्यान पक्षाचे जिल्हाध्यक्ष मुखेडमधील हालचालींची सतत माहिती घेत होते. नगराध्यक्ष व इतर पदांसाठी उमेदवार उभे करा, अशी सूचना आ. चिखलीकरांकडून दिली जात होती; पण मुखेडच्या दोन माजी आमदारांना पक्षाचे घड्याळ सुरू ठेवता आले नाही. घाटे यांचे पुतणे हेमंत घाटे यांनी काकांच्या पक्षाला पसंती देण्याऐवजी भाजपाची उमेदवारी स्वीकारली.

मुख्खखेड नगर परिषदेच्या निवडणुकीत मित्रपक्षांपैकी कोणाशीती युती करायची नाही, अशी भूमिका भाजपा आमदार डॉ. तुषार राठोड यांनी सुरुवातीलाच घेतली. गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने राठोड यांच्या विरोधातील बालाजी खतगावकर यांच्यासाठी काम केले होते. आता राष्ट्रवादीत असलेल्या घाटे, गोजेगावकर प्रभूतींनीही राठोड यांच्या विरोधातच प्रचार केला. या पाश्र्वभूमीवर शिंदे यांच्या शिवसेनेने मुरखेड नगर परिषदेत नगराध्यक्ष व सदस्य पदासाठी आपले उमेदवार स्वतंत्रपणे उभे केले आहेत. काँग्रेस पक्षाने नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी १२ जागांवर उमेदवार दिले आहेत.

मुखेड नगर परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसला एकही उमेदवार उभा करता आलेला नाही; पण जिल्ह्यातील देगलूर, कंधार, लोहा, धर्माबाद, भोकर या नगर परिषदांसह १० संस्थांमध्ये आमचा पक्ष स्वबळावर निवडणुकीमध्ये उतरला आहे. हदगाव नगर परिषदेत आमच्या पक्षाने खा. शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीशी तर किनवट नगर परिषदेत भाजपासोबत युती केली आहे. मुखेडमध्ये काय भूमिका घ्यायची, हे लवकरच पक्षाकडून जाहीर केले जाईल.
शिवराज पाटील होटाळकर जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news