Nanded Sand Smuggling : दोन हायवांसह ७०.५० लाखांचा मुद्देमाल जप्त

तिघांविरुद्ध गुन्हे दाखल
Nanded Sand Smuggling
Nanded Sand Smugglingpudhari photo
Published on: 
Updated on: 

नांदेड: जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खनन आणि चोरटी रेती वाहतुकीविरुद्ध नांदेड पोलिसांनी कंबर कसली आहे. पोलिस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशाने राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेंतर्गत नांदेड ग्रामीण आणि सोनखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या कारवाया करण्यात आल्या. यामध्ये दोन हायवा ट्रक आणि १० ब्रास वाळूसह एकूण ७० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून तिघांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिनांक २२ नोव्हेंबर रोजी पहाटे सोनखेड पोलिसांचे पथक पेनुर शिवारात गस्त घालत असताना, पेनुर ते पांगरी रोडवर (ता. लोहा) वाळूने भरलेला हायवा ट्रक (क्र. MH26-DB-9149) आढळून आला. पथकाने वाहन थांबवून चालक सचिन नामदेव नागरगोजे (वय २५, रा. आनंदवाडी, ता. कंधार) याची चौकशी केली.

Nanded Sand Smuggling
Nashik Auto Rickshaw Protest Against App Transport | अॅपआधारित वाहतुकीविरोधात रिक्षाचालक-मालक आक्रमक

गोदावरी नदीच्या पात्रातून परवान्याशिवाय वाळू चोरून नेल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी ३० लाखांचा हायवा आणि २५ हजारांची ५ ब्रास वाळू असा ३० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करत भारतीय न्याय संहिता व महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमान्वये गुन्हा नोंदवला.

दुसऱ्या कारवाईत, २२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी नांदेड ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने वसरणी येथील साई बाबा कमान रोड परिसरात सापळा रचला. संशयित टाटा हायवा (क्र. MH-26-CP-7909) तपासणीसाठी थांबवून चालक राहुल लक्ष्मण सरवर (वय ३२, रा. गारज, जि. छत्रपती संभाजीनगर; ह.मु. हडको, नांदेड) याच्याकडे विचारणा केली असता, त्याच्याकडे वाळू वाहतुकीची कोणतीही वैध रॉयल्टी पावती आढळली नाही.

Nanded Sand Smuggling
Dharashiv Agriculture : केवळ ५ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा; अनिश्चिततेचे सावट

याप्रकरणी ४० लाखांचा हायवा आणि २५ हजारांची ५ ब्रास वाळू असा ४० लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चालक राहुल सरवरसह हायवा मालक अमित हांबर्डे (रा. विष्णुपुरी, नांदेड) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ​ही कारवाई वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड ग्रामीण व सोनखेड पोलिसांच्या पथकांनी पार पाडली. अवैध रेती वाहतुकीविरोधात अशीच कठोर कारवाई पुढेही सुरू राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.