Nanded Crime News : नांदेडात पोलिसांचे जुगार अड्यांवर छापे; ८ जणांविरुद्ध कारवाई

नांदेड शहर आणि परिसरात बेकायदेशीर जुगार आणि मटका अड्ड्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे.
Nanded Crime
Nanded Crimepudhari photo
Published on
Updated on

Nanded News : Police raid gambling dens in Nanded; Action against 8 persons

नांदेड, पुढारी वृत्तसेवा: नांदेड शहर आणि परिसरात बेकायदेशीर जुगार आणि मटका अड्ड्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतली आहे. भाग्यनगर आणि इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पोलिसांनी लाखोंच्या मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केले असून, अनेक आरोपींवर गुन्हे दाखल केले आहेत.

Nanded Crime
Illegal Liquor Raid | पिशोर पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक मोहीम; दोन कारवायांत सव्वा लाखांचा मुद्देमाल जप्त

पहिली कारवाई भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. ३ जुलै रोजी रात्री १०.३५ वाजण्याच्या सुमारास राजकॉर्नर येथील एका शटरमध्ये बेकायदेशीरपणे 'मिलन डे' नावाचा जुगार खेळला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तेथे छापा टाकला.

या कारवाईत आरोपी नितुल विनोद चव्हाण (वय ३९, रा. निळा रोड, नांदेड) याच्यासह इतर सात जणांना ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना घटनास्थळी रोकड, दोन मोबाईल आणि तीन स्कुटी असा एकूण २,१३,८६० रुपयांचा मुद्देमाल आणि जुगाराचे साहित्य मिळून आले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक संकेत केशवराव सवराते यांच्या फिर्यादीवरून भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Nanded Crime
Parbhani Bori Drug Injection Seizure | जिंतूर तालुक्यातील बोरीत नशेच्या इंजेक्शनचा साठा जप्त; दोन आरोपी जेरबंद

दुसरी कारवाई इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. गंजेवार यांच्या घरासमोरील सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीरपणे 'नाईट मिलन' नावाचा मटका जुगार सुरू होता. पोलिसांनी गोपाळ नंदकुमार गजेवार (वय २६, रा. इतवारा) आणि भगवान मारोती कुरूडे (रा. महेबुब नगर, नांदेड) यांना मटका खेळताना व खेळवताना रंगेहात पकडले. त्यांच्याकडून ११,२६० रुपयांची नगदी रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल इसराईल युसुफ शेख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला.

तिसऱ्या कारवाईत इतवारा भागातीलच मंडई येथे ४ जुलै रोजी दुपारी ४.४५ वाजण्याच्या सुमारास तिसरी कारवाई करण्यात आली. येथे शोएब खान हुसैन खान (वय ३०, रा. मंडई, इतवारा) हा विनापरवाना 'मिलन डे क्लोज' नावाचा मटका जुगार चालवत असताना पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्याच्याकडून ३,२०० रुपयांची रोकड आणि मटक्याचे साहित्य जप्त करण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयाचे सहायक पोलीस उपनिरीक्षक विक्रम बालाजी वाकडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इतवारा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news