Nanded News : नायगाव पंचायत समितीत ‘घरकुल’ कोंडी अखेर फुटली, रखडलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

Nanded News : नायगाव पंचायत समितीत ‘घरकुल’ कोंडी अखेर फुटली, रखडलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात

नायगाव तालुक्यात १७,३०६ लाभार्थ्यांना दिलासा, प्रभारी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांची माहिती
Published on

नायगाव (जि. नांदेड) : नायगाव पंचायत समितीतील घरकुल योजनेचा रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागला असून, अवघड काम कसे सोपे करता येते याचा वस्तुपाठ प्रभारी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी दिला आहे. ११ कर्मचारी निलंबित, एक गटविकास अधिकारी रजेवर जाऊन फरार, प्रशासनात गोंधळ अशा वादग्रस्त खुर्चीचा पदभार स्वीकारून वैष्णव यांनी शांत, संयमी पण ठाम भूमिकेत घरकुल प्रश्न हाताळत लाभार्थ्यांना दिलासा दिला आहे.

घरकुल योजनेच्या थकीत हप्त्याची प्रतीक्षा अखेर संपली असून, दीर्घकाळ रखडलेली रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. नायगाव तालुक्यातील एकूण पात्र १९,४८३ लाभार्थ्यांपैकी १७,३०६ लाभार्थ्यांच्या खात्यात देयक जमा होणार असल्याची माहिती प्रभारी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव यांनी दिली.

तब्बल चार महिन्यांपासून हप्ता मिळावा म्हणून लाभार्थी दररोज पंचायत समितीच्या फेऱ्या मारत होते. ‘साहेब आज रजेवर आहेत’, ‘संप आहे’, ‘तांत्रिक अडचण आहे’, ‘डिजिटल अप्रुव्हल पूर्ण झाले नाही’ अशी उडवाउडवीची उत्तरे देत लाभार्थ्यांना परत पाठवले जात होते.

परिणामी घरकुलचे बांधकाम अर्धवट राहिले. वाढती महागाई, मजुरी आणि साहित्याच्या दरांमुळे अनेक कुटुंबे आर्थिक अडचणीत सापडली होती.

गटविकास अधिकाऱ्यांच्या वारंवार बदल्या, सामूहिक रजा आणि प्रशासकीय उदासीनतेमुळे नायगाव तालुक्यातील पात्र लाभार्थी महिनोन्महिने वंचित राहिले.

या प्रकरणात आमदार राजेश पवार यांनी पंचायत समितीतील गैरप्रकार उघडकीस आणत कर्मचाऱ्यांची झाडाझडती घेतली. घरकुल लाभार्थ्यांकडून लाच घेतल्याची कबुली असलेला व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तब्बल १२ कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी लागली. मात्र या प्रशासकीय अस्थिरतेचा फटका थेट लाभार्थ्यांनाच बसला.

दरम्यान, ही अडचण काहींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर यांनी गटविकास अधिकारी कार्यलय गाठून व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करत घरकुल लाभार्थ्यांना दिलासा दिला. प्रशासकीय दिरंगाई बदल खंत व्यक्त करीत त्यांनी आंदोलन केले. परिणामी रखडलेली प्रक्रिया सरकली आणि अखेर घरकुल हप्ते जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला.

यापुढे सामान्य जनतेच्या प्रश्नावर "राज" कारण न आणता या कामांवर कुरघोडीचे राजकारण होऊ नये अशी स्पष्टोक्ती होटाळकर यांनी व्यक्त केली.

सोशियल मीडियावर या घरकुल प्रकारनाचे पेव एवढे सुटले आहे की जाहिरात बाजी, बॅनर बाजी, करीत काहीनी सर्व काही माझ्यामुळे झाले असे आविर्भाव आणत आहेत काहीनी तर या प्रकरणाला वादाचे रूप देत सार्वजनिक ठिकाणी अश्लील भाषा वापरत वादाला तोंड फोडले असल्याचे दिसून आले.

नेते आरामात कार्यकर्ते जोमात अशी गत या घरकुल प्रकरणाने नायगाव तालुकात निर्माण झाली आहे. घरकुल प्रकरणाचे श्रेय घेण्या साठी राजकीय चढाओढ कार्यकर्त्या कढुन होत आहे. घरकुल लाभार्थ्यांना देयक मिळाल्यानंतर सोशल मीडियावर “आमच्या पाठपुराव्यामुळेच हप्ता मिळाला” असे दावे प्रति दावे होत आहेत एका व्हाट्सअप ग्रुप वर अश्लील भाषा वापरत शिवीगाळ करून घेतल्याचा पुरावा हाती आला असून त्याचे पर्यवसान घरा पर्यंत भांडण गेल्याचे दिसून आले.

नायगाव पंचायत समिती : घरकुल हप्ते स्थिती

  • एकूण पात्र लाभार्थी : १९,४८३

  • देयक मिळणारे लाभार्थी : १७,३०६

  • रखडलेला कालावधी : ४ महिने

  • प्रशासकीय कारवाई : १२ कर्मचारी निलंबित

  • निर्णायक भूमिका : प्रभारी गटविकास अधिकारी पुरुषोत्तम वैष्णव

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news