Nanded News | हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन; नायगावचे एक डॉक्टर निलंबित, दोघांवर कार्यवाही प्रस्तावित

आरोग्य विभागाची कारवाई ने अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले
File Photo
File Photo
Published on
Updated on

नायगाव : दै. 'पुढारी'ने वाचा फोडलेल्या नायगाव ग्रामीण रुग्णालयात खाजगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशत शवविच्छेदन केलेल्या प्रकरणात आरोग्य विभागाने कारवाईने केली आहे. या प्रकरणी एक डॉक्टरला निलंबित केले असून दोघांवर कारवाई प्रस्तावित आहे. आरोग्य विभागात काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांचे धाबे दणाणले आहेत.या मुळे ग्रामीण रुग्णालयातील कारभार पुन्हा ऐरणीवर आला आहे.

नायगाव ग्रामीण रुग्णालयात खाजगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर आरोग्य विभागाने संबंधित वैद्यकीय अधिकारी डॉ. मोतेचिन कादरी यांना निलंबित केले आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय माणिकराव पेरेके यांनी प्रत्यक्ष ग्रामीण रुग्णालयास भेट दिले असता चौकशी अंती हा प्रकार समोर आला. कर्तव्यात कसूर व आरोग्य विभागाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली अशी माहिती डॉ पेरेके यांनी दिली .

नायगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध असतानाही नियमबाह्य पद्धतीने खाजगी ॲम्ब्युलन्सच्या हेडलाईटच्या प्रकाशात शवविच्छेदन करण्यात आले होते. या प्रकाराने खळबळ उडाली होती आणि आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हा आरोग्य प्रशासनाने चौकशी सुरू केली. चौकशीअंती संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. व अन्य दोघांवर कार्यवाही प्रस्तावित असल्याचे दैनिक पुढारी सोबत बोलताना सांगितले .या कारवाईमुळे आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली असून ग्रामीण रुग्णालयातील अनागोंदी कारभार, नियोजनाचा अभाव आणि मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा प्रकाश पडला आहे.

दरम्यान, या घटनेपुरतीच कारवाई मर्यादित न ठेवता संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदार असलेल्या इतर संबंधितांवरही कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

दरम्यान टेंभुर्णी येथे विहिरीत पडून आत्महत्या केलेल्या प्रेताचे शेतात जाऊन शवविच्छेदन केल्याची चर्चा होत आहे या विषयी विचारले असता मृत व्यक्तीची बॉडी सडली असेल परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन परवानगीने शवविच्छेदन शेतात जाऊन करता येते असा खुलासा डॉ परके यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news