Nanded News : दुष्काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची ग्वाही

नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांसोबत आयोजित दिवाळी मिलन सोहळ्यात ते बोलत होते.
Nanded News
Nanded News : दुष्काळातही शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीर : उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांची ग्वाहीfile photo
Published on: 
Updated on: 

Nanded News: Even in drought, the government stands firm with the farmers: Industries Minister Dr. Testimony of Uday Samant

नांदेड, पुढारी वृत्तसेवा "राज्यातील शेतकऱ्यांनी सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत खचून न जाता कोणताही टोकाचा निर्णय घेऊ नये. राज्य शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून, त्यांच्या सर्व अडचणी सोडवण्यासाठी कटिबद्ध आहे," अशी ग्वाही राज्याचे उद्योग, गुंतवणूक, सेवा व मराठी भाषा विभागाचे मंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली. नांदेड तालुक्यातील सायाळ येथे शेतकरी, महिला आणि ग्रामस्थांसोबत आयोजित दिवाळी मिलन सोहळ्यात ते बोलत होते.

Nanded News
Nanded News : नांदेड जिल्ह्यात अवैध सावकारी अन् जबरी कर्जवसुलीविरुद्ध विशेष मोहीम

यावेळी हळद संशोधन केंद्राचे अध्यक्ष तथा आमदार हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंद तिडके-बोंढारकर, आमदार बाबूराव कदम-कोहळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड यांच्यासह विविध अधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान आमदार हेमंत पाटील यांनी धरणातील पाण्याचे समान वाटप आणि नाल्यांवर छोटे बंधारे बांधण्याची मागणी केली. आमदार बालाजी कल्याणकर यांनी शेतकऱ्यांना धीर दिला, तर आमदार आनंद तिडके-बोंढारकर यांनी दिवाळी अग्रिमची उर्वरित मदत तातडीने खात्यावर जमा करण्याची विनंती केली.

विधवा महिलेच्या घरी फराळ आणि रुग्णालयाची पाहणी या दौऱ्यात मंत्री डॉ. सामंत यांनी सायाळ येथील पाच मुलींच्या माता असलेल्या मुक्ताबाई केशव धुमाळे या विधवा महिलेच्या घरी जाऊन कुटुंबीयांसोबत फराळ केला आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच, गावकऱ्यांच्या समस्या जाणून घेत पिण्याच्या पाण्याच्या टँकरचा शुभारंभ केला. परतीच्या प्रवासात त्यांनी वाडी बु येथील उपजिल्हा रुग्णालयास भेट देऊन तेथील आरोग्य सुविधांची पाहणी केली आणि समाधान व्यक्त केले.

Nanded News
Nanded News : दिवाळीत भारनियमन खपवून घेणार नाही; खा. रवींद्र चव्हाण यांचा इशारा

योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीचे आश्वासन

पुढील दहा महिन्यांतील संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन पिण्याचे पाणी, टँकर आणि 'आनंदाचा शिधा' यांसारख्या आवश्यक उपाययोजनांचे नियोजन युद्धपातळीवर सुरू असल्याचे डॉ. सामंत यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व मंत्री यंदा गावोगावी दिवाळी साजरी करत असल्याचे सांगत, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कायम सुरू राहील आणि मुलींचे उच्च शिक्षण शुल्क माफ केले जाईल, अशी घोषणा त्यांनी केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.