Nanded Accident : हदगाव बसस्थानकात एसटीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू

तहसील कार्यालयातील काम आटपून घरी जाताना दुर्घटना
Nanded Accident News
हदगाव बसस्थानकात एसटीच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू
Published on
Updated on

हदगाव : हदगाव शहरातील बसस्थानक परिसरात एसटी बसने दिलेल्या धडकेत एका वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही दुर्दैवी घटना सोमवारी (दि.८) सकाळी ११.३० च्या सुमारास घडली. उत्तम आबाजी वाघमारे (वय अंदाजे ८० वर्षे, रा.पेवा, ता.हदगाव) असे मृताचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम वाघमारे हे सोमवारी संजय गांधी निराधार योजनेचे अनुदान जमा झाले आहे का? याची माहिती घेण्यासाठी तहसील कार्यालयात आले होते. काम आटोपून ते गावाकडे जाण्यासाठी बसस्थानकात आले असता सकाळी सुमारे ११.३० वाजण्याच्या सुमारास भंडारा–लातूर (एमएच-१४ एमएच-२७४०) क्रमांकाची एसटी बस स्थानकात प्रवेश करत होती. यावेळी बसस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ वाघमारे यांना बसची धडक बसली. धडक इतकी जोरदार होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी संबंधित बसचालकाला ताब्यात घेतले असून एसटी बसही पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली आहे. या घटनेमुळे बसस्थानक परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. पुढील तपास हदगाव पोलीस करीत आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news