

धर्माबाद : विशेष पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील प्रारूप मतदार यादी 3१ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होताच खळबळ उडाली आह. एकूण ७५ हजार ८३७ मतदाराच्या नोंदी तपासून ६५ हजार ६६२ मतदार पात्र ठरले आहेत, तर तब्बल १० हजार १७५ नावे वगळण्यात आली आहे.
वगळलेल्या मतदारांमध्ये ५ हजार ९१० कायमस्वरूपी स्थलांतरित, १ हजार ८८१ मृत, १ हजार १५४ अनुपस्थित, अथवा उपलब्ध नसलेली, तर १ हजार २२१ दुबार नोंदणीचा समावेश आहे. अन्य कारणामुळे ९ नावे व कळण्यात आली आहेत. प्रारूप यादीत नाव नसल्यास किंवा नाव पत्ता व अन्य तपशिलात दुरुस्ती अथवा हरकत असल्यास ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत दावा हरकत दाखल करता येणार आहे.
१ ऑक्टोबर २०२६ रोजी १८ वर्ष पूर्ण करणाऱ्या पात्र नागरिकांनाही नाव नोंदणीसाठी फॉर्म ६, नाव वगळण्यासाठी फॉर्म ७, तर दुरुस्तीसाठी फॉर्म ८ वापरता येणार आहे. दावे हरकती सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालय किंवा बी एल ओकडे दाखल करता येतील. या प्रक्रियेसाठी तालुक्यातील ८७ मतदान केंद्रावर ८७ बी एल ओ, ९ पर्यवेक्षक व ८ सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी कार्यरत होते. मतदारांनी यादी तपासून विहित मुदतीत दावा दाखल करावा; असे आव्हान तहसीलदार सुरेखा स्वामी यांनी केले आहे.