Nanded Crime | नायगावमध्ये गांजा विक्री करणाऱ्या तरुणाला अटक

महात्मा फुले कॉलनीतून ७ हजारांचा गांजा जप्त; २० वर्षीय तरुणाला अटक
  Crime News
Crime News (FiIle Photo)
Published on: 
Updated on: 

Naigaon Youth Arrested For Selling Ganja

नायगाव: नायगाव शहरात अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांना आळा घालण्यासाठी नायगाव पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. महात्मा फुले कॉलनी बसस्थानक परिसरात गांजा बाळगणाऱ्या एका २० वर्षीय तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. या कारवाईत १४४ ग्रॅम गांजा, अंदाजे ७ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे नायगाव शहरातील अमली पदार्थांच्या अवैध व्यवहारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली,श्याम पानेगावकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नायगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस ठाणे नायगाव येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  Crime News
Nanded News : एकीकडे पाणीकपातीचा घाट; दुसरीकडे बांधकामांवर मात्र पाण्याचा मारा भरमसाठ

या प्रकरणात श्रीकांत केशव भालेराव (वय २०, रा. महात्मा फुले कॉलनी, नायगाव) याला पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याकडून १४४ ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधिकारी महेश माळी करीत आहेत.

अमली पदार्थांचा विळखा रोखणार कोण?

नायगाव शहर आणि परिसरात तरुणाईला अमली पदार्थांच्या विळख्यापासून वाचविण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे. गांजासारख्या अमली पदार्थांची उपलब्धता आणि त्यामागील संभाव्य साखळी यांचा शोध घेणे आवश्यक आहे. केवळ किरकोळ कारवाईपुरते न थांबता अमली पदार्थांचा पुरवठा कुठून होतो, त्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलिसांनी सखोल तपास करावा, अशी अपेक्षा नागरिकांतून व्यक्त होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.